दालमा - ओडिसा टेम्पल स्टाईल (dalma recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 #रेसिपी_2
सात्विक... दालमा हा ओडिसा मधिल मंदिरांमध्ये भातासोबत प्रसाद म्हणून दिला जाणारा सात्विक पदार्थ आहे. खूप छान आणि सात्विक परमानंद देणारी आशी याची चव आहे... तेव्हा नक्की करून बघा... चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😁
दालमा - ओडिसा टेम्पल स्टाईल (dalma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #रेसिपी_2
सात्विक... दालमा हा ओडिसा मधिल मंदिरांमध्ये भातासोबत प्रसाद म्हणून दिला जाणारा सात्विक पदार्थ आहे. खूप छान आणि सात्विक परमानंद देणारी आशी याची चव आहे... तेव्हा नक्की करून बघा... चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😁
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी सगळ्या डाळी स्वच्छ धुऊन वीस मिनिटे पाण्यात भिजत घालायच्या. डाळ भिजून होईपर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या चारून घ्यायच्या. बारीक चिरायच्या नाहीत. आले किसून घ्यायचे. यामध्ये तुम्ही आणखी भाज्या घेऊ शकता तुम्हाला आवडत असल्यास. ओडीसा दालमामध्ये मुख्यतः पपई वापरला जातो तसेच कच्ची केळी वापरली जातात पण माझ्याकडे तीन नसल्याने मी घातली नाहीत.
- 2
एकीकडे मेथी दाणे भाजून घेऊन ते कुटून घ्यायचे. त्याचप्रमाणे एक टी स्पून जिरे आणि 3 सुक्या लाल मिरच्या पण भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची.
- 3
आता कुकरमध्ये भिजवलेली डाळ, चिरलेल्या भाज्या, हळद, मीठ आणि किसलेले आले घालून त्यात एक ग्लास पाणी घालायचे आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत डाळ आणि भाज्या शिजवून घ्यायची. जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत. कारण आपल्याला भाज्या आख्ख्या ठेवायच्या आहेत.
- 4
आता फोडणीसाठी एका पातेल्यात तूप गरम करायचे. तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यात दोन टीस्पून जिरे घालायचे. जिरे तडतडल्यावर त्यात तमालपत्र तुकडे करून टाकायचे. मग त्यात 4 सुक्या लाल मिरच्या तोडून टाकायच्या. तसेच हिंग घालायची.
- 5
फोडणीत लगेच शिजलेली डाळ आणि भाज्या घालायच्या. तसेच एका ग्लास पाणी घालायचे आणि चांगले मिक्स करायचे.
- 6
आता चव बघून त्यात लागले तर थोडेसे मीठ घालायचे आणि जिरे आणि सुक्या मिरचीची केलेली पावडर घालायची. चांगले मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची आणि सर्वात शेवटी एक टेबलस्पून खोवलेला नारळ आणि एक टेबलस्पून तूप घालून मिक्स करून गॅस बंद करायचा.
- 7
तयार आहे आपला गरमागरम सात्विक ओडिसा स्टाईल दालमा... हा दालमा प्लेन राईस सोबत खूप छान लागतो... 👌👌😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes
- होममेड मोझरेला चीज (home made mozzarella cheese recipe in marathi)
- ढाबा स्टाईल दूध शेव भाजी (dudh shev bhaji recipe in marathi)
- राजभोग आईस्क्रीम (rajbhog icecream recipe in marathi)
- दोन लेयर दूध बर्फी (milk barfi recipe in marathi)
- ओल्या नारळाच्या बटाटा खोबर्याच्या वड्या (batata khobra recipe in marathi)






















टिप्पण्या (7)