सिनामन रोल आणि जॅम स्टार ब्रेड (cinnamon roll and jam star bread recipe in marathi)

#NoOvenBaking #Cooksnap
नेहा शहा यांनी दाखवलेली ही रेसिपी खून छान आहे. त्यासाठी त्यांना थँक्यू सोबत त्यांनी खूप छान प्रकारे सिनामन रोल बनवायचे दाखवले. मी त्यात आणखी एडिशन म्हणून त्याच कणकेपासून मिक्स फ्रुट जॅमस्टार ब्रेड बनवून पाहिला. तोही खूप मस्त झाला आहे. आता बेकिंगसाठी यीस्ट आणि अंडी न वापरताही खूप छान डिशेस बनवता येतील. थँक्स टू मास्टर शेफ नेहा शहा... 🙏🏻🙏🏻😍😍
सिनामन रोल आणि जॅम स्टार ब्रेड (cinnamon roll and jam star bread recipe in marathi)
#NoOvenBaking #Cooksnap
नेहा शहा यांनी दाखवलेली ही रेसिपी खून छान आहे. त्यासाठी त्यांना थँक्यू सोबत त्यांनी खूप छान प्रकारे सिनामन रोल बनवायचे दाखवले. मी त्यात आणखी एडिशन म्हणून त्याच कणकेपासून मिक्स फ्रुट जॅमस्टार ब्रेड बनवून पाहिला. तोही खूप मस्त झाला आहे. आता बेकिंगसाठी यीस्ट आणि अंडी न वापरताही खूप छान डिशेस बनवता येतील. थँक्स टू मास्टर शेफ नेहा शहा... 🙏🏻🙏🏻😍😍
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधामध्ये व्हिनेगर घालून दहा मिनिट ठेवायचे. मग एका मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, साखर हे सगळे मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यात व्हिनेगर घातलेले दूध आणि मेल्टेड बटर घालून चांगली मऊसूत कणिक करून घ्यायची.
- 2
फिलिंग साठी एक वाटीमध्ये एक टेबलस्पून बटर, ब्राऊन शुगर आणि दालचिनी पावडर मिक्स करून ठेवायचे. स्टार ब्रेडसाठी दोन मोठे चमचे जॅम घेऊन थोडा फेटून ठेवायचा.
- 3
आता एकीकडे बेकिंग साठी एका पसरट कढईमध्ये स्टॅन्ड ठेवून झाकण लावून कढई 10 मिनिटांसाठी प्रिहीट करून घ्यायची. दहा मिनिटानंतर कणकेचे दोन भाग करून घ्यायचे.
- 4
आता दोन भागांमधील एका भागाचा गोळा करून त्याचा आयताकृती लाटा लाटून घ्यायचा. त्यावर सिनामन पावडरचे मिक्स्चर पसरवून घ्यायचे आणि बुकफोल्ड करून घ्यायचा. आता त्याचे चार भाग कट करायचे. यातील एक भाग घेऊन त्याला उभे तीन कट मारायचे आणि वेणी घालून दोन्ही बाजे जोडून घ्यायच्या. आता हे रोल्स ॲल्युमिनियम फाॅईलच्या मोल्मडध्ये ठेवायचे आणि हे मोल्ड्स एका छोट्या ताटात किंवा प्लेटमध्ये ठेवेयचे.
- 5
आता सिनामन रोल्सला वरून थोडे बटर लावायचे आणि ही प्लेट प्रिहिट केलेल्या कढईमध्ये बेक करायला ठेवायची. साधारण वीस ते पंचवीस मिनिटानंतर ओपन करून बघायचे. वरून ब्राऊन कलर आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि प्लेट बाहेर काढून ठेवायची.
- 6
तयार आहे आपला ट्विस्टेड सिनामन रोल... 😍😋
- 7
आता स्टार ब्रेड बनवण्यासाठी उरलेल्या दुसऱ्या भागाचे चार भाग करून गोळे करून घ्यायचे आणि त्याचे फुलक्याच्या आकाराच्या चार पोळ्या लाटून घ्यायच्या. आता त्यातील एक पोळी घेऊन त्यावर थोडा जॅम पसरवून घ्यायचा. मग त्यावर दुसरी पोळी ठेवायची. पुन्हा त्यावर जॅम पसरून घ्यायचा. अशीच तिसरी पोळी ठेवून त्यावर जॅम पसरवायचा आणि चौथी पोळी ठेवून थोडेसे हाताने दाबायचे.
- 8
आता याच्या मधोमध एक छोटेसे बॉटलचे टोपण ठेवायचे. मग पहिला त्याला आठ बाजूने कट मारून घ्यायचा. मग पुन्हा त्याच्यामध्ये कट मारून घ्यायचा. असे एकूण सोळा भाग करून घ्यायचे. आता त्यातील दोन भाग दोन्ही हातांच्या तीन बोटांमध्ये पकडायचे आणि बाहेरच्या बाजूला एक फोल्ड मारायचा. तसाच दुसरा फोल्ड मारायचा. असे सगळे फोल्ड मारून घ्यायचे. मग सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा तसेच पकडून बाहेरच्या बाजूला फोल्ड करत उभा झाल्यावर दोन्ही बाजू चिकटवून घ्यायच्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशाप्रमाणे सगळे फॉल्ड मारून घ्यायचे.
- 9
आता कढाई पुन्हा प्रिहिट करून घ्यायची आणि एका प्लेटला थोडेसे बटर लावून घ्यायचे. त्या प्लेटच्या आकाराचा बटर पेपर कट करून घ्यायचा. यावर तयार स्टार ब्रेड ठेवायचा आणि वर बटर लावून घ्यायचे. स्टार ब्रेडच्या मधे एक लवंग लावायची. छान दिसते. आताही प्लेट प्रेहीट केलेल्या कढईमध्ये बेक करायला ठेवायची. साधारण 25 मिनिटे लागतात. मध्ये मध्ये चेक करायचे आहे. गोल्डन ब्राऊन कलर आला की गॅस बंद करून प्लेट बाहेर काढायची. गॅस लो टू मेडियम वर ठेवायचा. नाही तर जॅम पातळ होऊन खाली जळतो त्यामुळे ब्रेडची चव कडवट होते.
- 10
तयार आहे आपला मिक्स फ्रुट जॅम स्टार ब्रेड... 👍🏻😍😋
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes



























टिप्पण्या