व्हेज तिरंगा पुलाव/बिर्याणी (veg tiranga pulav recipe in marathi)

#तिरंगा
१५ ऑगस्ट म्हटलं की नवीन काहीतरी करावं मनात आले आणि ठरवले आज जर हटके काहीतरी करू, व्हेज पुलाव बिर्याणी नेहमी करते पण पद्धत वेगळी असते, आज तिरंगा दाखवायचा आहे,आणि मग आयडिया ची कल्पना बाहेर आली, चला म्हटलं आज ह्या पद्धतीने करून पाहू सक्सेस तर होणारच, तेवढा विश्वास होताच,आणि झाली ना राव तिरंगा बिर्याणी,तुम्हाला पण आवडेल,पहिली पोस्ट आहे माझी #COOKPAD वर पहा आवडते का तुम्हाला,
बिर्याणी म्हटलं की चिकन किंवा मटण च आठवते पण व्हेज मध्ये पण छान बिर्याणी बनवता येते बर का चविष्ट होते खूप, माझी पहिलीच रेसिपी आहे #"कूकपॅड" वर त्यामुळे थोडं फार इकडे तिकडे झाले असेल,काही शंका असेल कंमेंट करून विचार नक्कीच उत्तर मिळेल,पुढच्या वेळी proper फोटो सहित मस्त रेसिपी घेऊन येईल, खूप खूप मस्त फील येत आहे धन्यवाद कूकपॅड ग्रुप

कुकिंग सूचना
- 1
तांदूळ मस्त धुऊन, अर्धा तास भिजत ठेवायचा,एक पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचे त्यात2 मिरे2 लवंग टेजपत्ता कर्णफुल,बडी इलायची,दालचिनी चा एक तुकडा अस सगळं टाकायचं उकळी अली की त्यात भिजवलेला तांदूळ टाकायचा, एक चमचा साजूक तूप टाकायचं,, मीठ टाकायचं80% शिजवायचे,नंतर चाळणी मध्ये काढून घायचा,
- 2
सगळ्या भाज्या कापून धुऊन वाफवून घायच्या,कांदा चिरून फ्राय करून ठेवायचा
- 3
टोमॅटो प्युरी करायची,
- 4
एक कढई मध्ये तेल टाकून लवंग मिरे टेजपत्ता, दालचिनी,बडीईलायची,टाकून थोडे परतले की त्यात अलेलसून कोथंबीर ची पेस्ट टाकायची, मस्त परतू द्यायची,मग टोमॅटो प्युरी टाकायची,मीठ टाकायचं,तिला पण मस्त परतून घायच तेल सुटे पर्यंत,त्यात बिर्यानि मसाला टाकायचा,
- 5
2 बाउल घेतले त्यात एक मध्ये नारंगी रंग टाकला अर्धा कप पाणी टाकून,दुसऱ्या मध्ये हिरवा आता थोडा भात नारंगी मध्ये आणि थोडा हिरव्या मध्ये टाकून मिक्स करून ठेवले बाकी पांढरा ठेवला,आता एक भांड्यामध्ये मी कूकर घेतला होता त्यात खाली तेल टाकले,बनवलेला मसाला टाकला, त्यावर वाफवलेल्या भाज्या टाकल्या,मग पांढरा भात टाकला फ्राय केलेला कांदा टाकला,आता आपल्याला १५ ऑगस्ट निम्मित रईस करायचा म्हणून मी कुकर च्या थोड्या भागात हिरवा रंगाच्या भाताचा थर दिला मग परत पांढरा आणि मग नारंगी,वरून थोडं साजूक तूप टाकले,
- 6
फॉईल पेपर ने कुकर झाकून घेतला १५ मिनटं वाफ घेतली आणि बंद केला गॅस
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (12)