पनीर मखनी पिझ्झा (paneer makhani pizza recipe in marathi)

Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
इंडिया

#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी -1
पनीर मखनी पिझ्झा
फ्युजन रेसिपी म्हंटलं कि माझा आवडता विषय. काही तरी नवीन करण्याची सतत तयारी असते. काही फसतात काही एकदम मस्त होतात. तर आज च्या थीम मध्ये पहिली रेसिपी आपण करणार आहे पनीर माखनी पिझ्झा ची. पिझ्झा हा सर्वांचा लाडका नाही का? तर यात मी माखनी सॉस करून फ्युजन रेसिपी तयार केली आहे. खूप छान माझ्या घरी सर्वांना खूप आवडली .. तुही सुद्धा नक्की करा.

पनीर मखनी पिझ्झा (paneer makhani pizza recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी -1
पनीर मखनी पिझ्झा
फ्युजन रेसिपी म्हंटलं कि माझा आवडता विषय. काही तरी नवीन करण्याची सतत तयारी असते. काही फसतात काही एकदम मस्त होतात. तर आज च्या थीम मध्ये पहिली रेसिपी आपण करणार आहे पनीर माखनी पिझ्झा ची. पिझ्झा हा सर्वांचा लाडका नाही का? तर यात मी माखनी सॉस करून फ्युजन रेसिपी तयार केली आहे. खूप छान माझ्या घरी सर्वांना खूप आवडली .. तुही सुद्धा नक्की करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३ तास
३-४
  1. पिझ्झा बेस करीत
  2. 2 (1/2 कप)गव्हाचे पीठ
  3. 1 कपकोमट पाणी
  4. 1 टीस्पूनयीस्ट
  5. 1 टेबलस्पूनसाखर
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 2 टेबलस्पूनतेल/बटर
  8. माखनी सॉस करिता
  9. 1 टीस्पूनतेल
  10. 1कांदा
  11. 3टोमॅटो
  12. 3-4लसूण पक्या
  13. 2हिरव्यामिरच्या
  14. 1 इंचआलं
  15. 3-4काश्मिरी लाल मिरच्या
  16. 6-7काजू
  17. 1 (1/2 कप)पाणी
  18. 1 टेबलस्पूनबटर
  19. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  20. मीठ चवीनुसार
  21. 1 टेबलस्पूनसाखर
  22. 1 टीस्पूनगरम मसाला
  23. 1/2 टेबलस्पूनधणेपूड
  24. 1 टेबलस्पूनपनीर टिक्का मसाला
  25. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  26. 3 टेबलस्पूनफ्रेश क्रिम
  27. पनीर मॅरिनेटे करण्याकरिता
  28. २०० ग्राम पनीर
  29. 1 टीस्पूनलाल तिखट
  30. मीठ चवीनुसार
  31. 1/2 टीस्पूनआमचूर
  32. पिझ्झा टॉपिंग
  33. पिझ्झा सीजनिंग
  34. 1 कप(शिमला, कांदा, ऑलिव्हस, मश्रूम)
  35. चीज आवडीनुसार

कुकिंग सूचना

२-३ तास
  1. 1

    सर्वप्रथम आपण पिझ्झा बेस तयार करूया. त्या साठी पाणी, साखर आणि यीस्ट एकत्र करून १० मिनिटे ऍक्टिव्हेट व्हयला बाजूला ठेवा.

  2. 2

    ऍक्टिव्हेट झाल्यास गव्हाच्या पिठात मिक्स करून त्यात मीठ घालून सैल पीठ भिजवून घेणे. तेल घालून पिठा ला १० मिनिटे मळून घेणे. नंतर पीठ थोडं गरम ठिकाणी १- १ १/२ तास फुलण्याकरिता ठेवावे.

  3. 3

    तो पर्यंत सॉस तयार करून घ्यावा. त्या साठी एका पॅन मध्ये तेल, जिरे, कांदा, लसूण, आलं, काजू, मिरच्या, लाल मिरच्या घालून परतावा, त्यात मग टोमॅटो घालून ५-६ मिनिटे शिजवावं नंतर पाणी घालून टोमॅटो मऊ होई पर्यंत शिजवावं.

  4. 4

    थंड झळया मिक्सर ला बारीक पेस्ट करावी. वेगळ्या पॅन मध्ये बटर, त्यातच मीठ, लाल तिखट, धणेपूड, साखर मसाला घालावं आणि १ मिनिट परतावं, नंतर त्यात तयार पेस्ट घालून शिजवावं. सॉस मध्ये फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी घालावी. आणि सॉस घट्ट होऊ द्यावा.

  5. 5

    नंतर पनीर ला मसाले घालून बाजूला ठेवावे.

  6. 6

    नंतर दीड तासाने पिझ्झा बेस चा पीठ डबल झाला असेल ते कडून घ्यावं. ओव्हन प्रीहेअटींग ला लावावा (४५० F). नंतर पिझ्झा बेस चा एक उंडा घेऊन मोठी अशी जाडसर पोळी लाटावी त्या वर माखनी सॉस, सर्व भाज्या,नंतर मॅरिनेटेड पनीर, त्या वर आवडेल तितका चीज आणि पिझ्झा सिजनिंग घावली.

  7. 7

    पिझ्झा १५-१८ मिनिटे बेक करावा.

  8. 8

    काढून गरमागरम सर्व करावं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

Similar Recipes