वडापाव केसाडिला (vadapav quesadilla recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9
वडापाव केसाडिला ही डीश इंडियन आणि मेक्सिकनची फ्युजन रेसिपी आहे. मुंबई स्पेशल वडापाव आणि मेक्सिकन स्पेशल केसाडिला!!!
वडापाव केसाडिला (vadapav quesadilla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9
वडापाव केसाडिला ही डीश इंडियन आणि मेक्सिकनची फ्युजन रेसिपी आहे. मुंबई स्पेशल वडापाव आणि मेक्सिकन स्पेशल केसाडिला!!!
कुकिंग सूचना
- 1
सुकी चटणीसाठी सुकं खोबरं, शेंगदाणे आणि काश्मिरी लाल मिरच्या चांगले भाजून घ्यावे. १ टीस्पून तेलात लसूण तळून घ्यावेत.
- 2
थंड झाल्यावर चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे.
- 3
हिरव्या चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यावे. बटाटे उकडून बारीक करून घ्यावेत.
- 4
गव्हाच्या पीठात मीठ आणि तेल घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
- 5
बटाट्याच्या मिश्रणासाठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्यावी. आलं लसूण पेस्ट, हळद आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी.
- 6
उकडलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. लींबू रस आणि कोथिंबीर घालावी.
- 7
पीठाचा गोळा करून लाटून घ्यावे. (समान आकार करावा.)
- 8
तव्यावर थोडे दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावे.
- 9
केसाडिला बनविण्यासाठी रोटीला हिरवी चटणी लावून त्यावर बटाट्याचे मिश्रण लावावे.
- 10
वरुन आवडीनुसार कांदा आणि सुकी चटणी घालावी. त्यावर दूसरी रोटी ठेवावी.
- 11
तव्यावर ब्रशने तेल लावून त्यावर ठेवावे. दोन्ही बाजूंनी चांगले शेकावे. सुकी चटणी आणि हिरव्या चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावे!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes



































टिप्पण्या (4)