तिरंगी हुमुस (tirangi hummus recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#तिरंगा हुमुस हे चणे, ताहिनी, तेल, लिंबाचा रस आणि लसूण यापासून बनवले जाते. हि मिडल इस्टर्न पाककृती जगभरात लोकप्रिय आहे. हे उत्तर अमेरिका आणि युरोपमधे देखील आढळून येते.
मी त्याला थोडी भारतीय खाद्य पदार्थांची जोड दिली आहे. हुमुस हा प्रकार चटणी सारखा असतो. हा पदार्थ सॅलड बरोबर डिप म्हणून वापरला जातो.

तिरंगी हुमुस (tirangi hummus recipe in marathi)

#तिरंगा हुमुस हे चणे, ताहिनी, तेल, लिंबाचा रस आणि लसूण यापासून बनवले जाते. हि मिडल इस्टर्न पाककृती जगभरात लोकप्रिय आहे. हे उत्तर अमेरिका आणि युरोपमधे देखील आढळून येते.
मी त्याला थोडी भारतीय खाद्य पदार्थांची जोड दिली आहे. हुमुस हा प्रकार चटणी सारखा असतो. हा पदार्थ सॅलड बरोबर डिप म्हणून वापरला जातो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हींग
  1. पांढर्या हुमुससाठी
  2. 1 कपशिजवलेले छोले
  3. 1/4 कपतीळ
  4. 2 टीस्पूनजिरे
  5. 3 टीस्पूनलिंबू रस
  6. 3 टीस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनचिरलेलं लसूण
  8. चिमूटभरसाखर
  9. चिमूटभरहिंग
  10. आवश्यकतेनुसारपाणी
  11. चवीनुसारमीठ
  12. 1चक्रफूल
  13. केशरी हुमुससाठी
  14. 1/2 कपकिसलेले गाजर
  15. 1 टीस्पूनचिरलेलं लसूण
  16. 1/2 टीस्पूनतीळ
  17. 2 टीस्पूनतेल
  18. चिमूटभरहिंग
  19. चवीनुसारमीठ
  20. 1 टेबलस्पूनतयार पांढरे हुमुस
  21. हिरव्या हुमुससाठी
  22. 1/2 कपकोथिंबीर
  23. 1 टीस्पूनचिरलेला लसूण
  24. 1 टीस्पूनजिरे
  25. चवीनुसारमीठ
  26. 1 टेबलस्पूनतयार पांढरे हुमुस
  27. 2 टीस्पूनलिंबू रस

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम छोले रात्रभर भिजवून सकाळी निथळून कुकरमधे शिजवून घ्यावे. तीळ भाजून घ्यावे. मग मिक्सरमधे शिजवलेले छोले, 1/4 कपातले अर्धे भाजलेले तीळ, जिरे, तेल, लसूण, हिंग, मीठ आणि साखर घालून आवश्यकतेनुसार पाणी वापरुन सर्व मिक्सरमधे वाटून घ्यावे. हे झाले पांढरे हुमुस तयार.

  2. 2

    आता एका कढईत तेल घेऊन त्यात हिंग आणि लसूण घालावा.जरा परतून मग त्यात किसलेले गाजर घालावे. जरावेळ परतून तीळ घालून थोडे शिजवून घ्यावे. जरा गार झाल्यावर मिक्सरमधे शिजवलेले गाजर, तयार पांढरे हुमुस 1 टेबलस्पून, मीठ,तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधे वाटून घ्यावे. हे झाले केशरी हुमुस तयार.

  3. 3

    आता तयार पांढरे हुमुस 1 टेबलस्पून, कोथिंबीर, लसूण, लिंबू रस, जिरे, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधे वाटून हिरवे हुमुस तयार करुन घ्यावे.

  4. 4

    तीनही रंगाची हुमुस तिरंगा पद्धतीने सजवावी. पांढर्या हुमुसवर चक्रफूल लावावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes