पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपती
इथ येईल आनंदाला भरती.....
साडी चोळी नवी नेसुन मिरवायाला
गौरी गणपतीच्या सणाला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला....।।।।।
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपती
इथ येईल आनंदाला भरती.....
साडी चोळी नवी नेसुन मिरवायाला
गौरी गणपतीच्या सणाला
बंदु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला....।।।।।
कुकिंग सूचना
- 1
भिजविलेली चणाडाळ चिमूटभर हळद आणि मीठ घालून ३-४ शिट्ट्या शिजवून घ्यावे.डाळ चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी म्हणजेच "कट" वेगळा बाजूला काढावा. (या कटाचीच प्रसिद्ध आमटी बनते.)
- 2
पूरण शिजवण्यासाठी एका कढईत १ टेबलस्पून तूप घालून त्यात शिजलेली चण्याची डाळ (गरम असतानाच) घालावी आणि बरोबरच किसलेला गूळही घालावा. मध्यम आचेवर गूळ पूर्ण विरघळून द्यावा. १०-१५ मिनिटांत पुरण शिजत आले की त्यातील गुळाचा रस आटत येऊन डाळीत एकजीव होतो. (पुरण शिजले कि नाही हे पाहण्यासाठी त्याच्या मधोमध कढईत एक चमचा उभा करून ठेवावा, जर तो चमचा नीट उभा राहिला तर समजावे कि पुरण शिजले!). वेलचीपूड आणि जायफळ पूड घालावी. पूरण थंड झाले कि ते पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक वाटून घ्यावे.
- 3
मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद घालून एकत्र मिसळून घ्यावी. १ टेबलस्पून तेल घालून पिठात चांगले रगडून घ्यावे जेणेकरून पोळ्या खुसखुशीत होतात. थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे. सुती ओल्या कपड्याने ३० मिनीटे झाकून ठेवावे.
- 4
पीठाच्या गोळ्यात पूरण भरून तांदळाच्या पिठावर पोळी लाटावी.
- 5
तवा मध्यम आचेवर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी भरपूर तूप घालून खरपूस गुलाबी करड्या रंगावर भाजून घ्यावी.
- 6
गरमागरम सर्व्ह करावे!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या