एगलेस बनाना मफिन्स (eggless banana muffin recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
#इंटरनॅशनल
मफीन्स हा अमेरिकन पदार्थ आहे. ब्रिटन मध्ये याला 'अमेरिकन मफिन्स' असंच म्हणतात. सकाळच्या न्याहारीला हा प्रकार खाल्ला जातो. मफिन्स दोन प्रकारचे असतात - एक फ्लॅटब्रेड सारखे आणि दुसरे कप केक सारखे. हे गोड किंवा तिखटमिठाचे ही बनवले जातात. माझी ही रेसिपी बनाना मफिन्स ची - तीही अंडं न घालता केलेली. खूप स्वादिष्ट लागतात हे मफिन्स. आणि रेसिपी अगदी सोपी आहे. - अमेरिकन ब्रेकफास्टचा लोकप्रिय पदार्थ

कुकिंग सूचना
- 1
एका वाडग्यात केळी सोलून कुस्करून घ्या. त्यात साखर, मध आणि तूप/तेल घालून चांगलं एकत्र करून घ्या.
- 2
दुसऱ्या वाडग्यात कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या.
- 3
कणकेच्या वाडग्यात केळ्याचे मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू नका.
- 4
मिश्रण फार घट्ट असेल तर थोडे दूध घालून मिक्स करा.
- 5
ओव्हन १९० डिग्री वर गरम करून घ्या.
- 6
मफिन साच्याना तूप लावून त्यात मोठ्या चमच्याने मिश्रण घाला. पाऊण साचा भरेल एवढं मिश्रण घाला. वरून सुका मेवा घाला.
- 7
ओव्हन मध्ये १९० डिग्री वर ३०-३५ मिनिटं बेक करा.
- 8
गरमागरम बनाना मफिन्स कॉफीसोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)