ज्वारीच्या पिठाचे फुलके (jwarichya pithache fulke recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

फुलके रेसिपी
फुलके म्हंटले कि आपण गव्हाच्या पिठाचे फुलके सगळेजण करतात. पण मी आज ज्वारीच्या पिठाचे फुलके रेसिपी पोस्ट करत आहे.
ज्वारी ची भाकरी केली जाते पण मी आज नवीन इंनोव्हेशन करून पाहिले आणि ते खूप छान झाले. ज्वारी पचण्यास हलकी असते. जे डाएट करतात त्यांना ही रेसिपी नक्की करून पाहावी. आणि काही भाज्या असे असतात कि त्याला भाकरीच छान लागते जसे एखादी ग्रेव्ही भाजी, पिठले, पालेभाजी. भाकरी हाताने थापून करतात पण मी आज लाटून कसे करतात ती रेसिपी पोस्ट करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपज्वारीचे पीठ
  2. 1 कपपाणी
  3. चवीला किंचित मीठ (ऑपशनल)
  4. फुलक्यांना लावण्यासाठी थोडे साजूक तूप

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम पातेल्यात जेवढे पीठ घेणार आहात तेवढेच आधी पाणी मोजून उकळण्या साठी ठेवावे. पाण्याला उकळी आली कि हवे असेल तर चिमूटभर मीठ घालावे व लगेचच गॅस बारीक करून मोजून घेतलेले ज्वारीचे पीठ त्या पाण्यामध्ये थोडे थोडे करत घालावे. ते पीठ एकजीव करून 10 मिनिट झाकून ठेवावे. गॅस बंद करावा.

  2. 2

    नंतर पातेल्यातील पीठ पराती मध्ये घेऊन 3 ते 4 मिनिट चांगले मळून घेणे. त्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत.

  3. 3

    एक गोळा घेऊन तो पिठामध्ये घोळून त्याची जशी आपण पोळी करतो त्या प्रमाणे त्या गोळ्याची पातळ पोळी लाटावी.तो फुलका तापलेल्या तव्यावर भाजण्यासाठी ठेवावा.

  4. 4

    एका बाजूने 3 मिनिट भाजला कि तो फुलका उलटा करून घेणे. वरची बाजू उलटी करून ती 3 मिनिटे भाजली कि जशी आपण गव्हाचा फुलका करतो तसा तो गॅस वर तवा बाजूला करून वरची बाजू भाजून घेणे.

  5. 5

    अशा प्रकारे सगळे फुलके करून घेणे. हे फुलके खूप मऊ आणि पातळ असे होतात. या फुलक्यांना तेल न लावता तूप लावावे. हे पोळी सारखेच मऊ राहतात.मस्त एखादी पालेभाजी किंवा उसळ या सोबत खावी. मस्त बेत जमतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes