अळूवडी (alu vadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 14
#बर्फी आणि अळूवडी
अळूवडी हा माझा खूप आवडीचा पदार्थ आहे. महाराष्ट्रात आवर्जून प्रत्येक सणाला देवाच्या नैवेद्यात होणारा असा हा पदार्थ आहे. त्याचे खूप प्रकार आहेत त्यातला एक माझ्या आवडीचा प्रकार.
अळूवडी (alu vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14
#बर्फी आणि अळूवडी
अळूवडी हा माझा खूप आवडीचा पदार्थ आहे. महाराष्ट्रात आवर्जून प्रत्येक सणाला देवाच्या नैवेद्यात होणारा असा हा पदार्थ आहे. त्याचे खूप प्रकार आहेत त्यातला एक माझ्या आवडीचा प्रकार.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सुख खोबरं तीळ खसखस ओवा बडीशेप हे सर्व छान खरपूस भाजून घ्यावे मग त्यामध्ये लाल मिरची पावडर शिरपूर चवीप्रमाणे मीठ हे सगळे जिन्नस टाकून एकत्र मिश्रण करून घ्यावे. हे दीड कप मिश्रण दोन कप बेसन मध्ये मिक्स करावे त्यामध्ये चिंचगुळाचे पाणी पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ हे सगळे जिन्नस टाकून वडी साठी थोडेसे सैलसर असे पीठ मिक्स करून घ्यावे.
- 2
अळूवडी ची पाने स्वच्छ धुऊन घ्यावी. ही मिनि वडी असल्यामुळे जास्त पान लागत नाही. एका वलकुटी मध्ये तीन पानं पुरेसे होतात. सर्वात पहिलं मोठ पान घ्यावे त्याला पीठ लावून घ्यावं व मध्यम पण घ्या त्याला पीठ लावून घ्यावं आणि त्याच्यावर छोटे पान ठेवून त्याला ही पीठ लावून घट्ट दोन्ही बाजूने बंद करून घ्यावी.
- 3
पातेल्यात पाणी ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर चाळणी ला थोडे तेल लावून त्यावर अळूचे उंडे पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यावेत. वीस मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करून बाहेर काढून थोडा थंड करून घ्याव्यात.
- 4
मग पॅनमध्ये तेल टाकून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून गरमागरम अळूवडी सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या