पियुष (piyush recipe in marathi)

#GA4 #Week8 की वर्ड milk #cooksnap..प्रांजल कोटकर यांची ही रेसिपी.खूप खूप धन्यवाद प्रांजल.. अप्रतिम चवीचा झालाय पियुष ..अगदी प्रकाशची चव आलीये.😋...एक थंडगार सुखद एहसास
पियुष नावातच जादू आहे. अशी जादू की भलेभले त्याकडे खेचले जातात. उन्हाळ्याच्या दिवसातले हे पौष्टिक पेय.. जिभेवरून घशाकडे जातानाचा याचा थंडगार अवीट गोडीचा प्रवास केवळ शब्दातीत.. पहिला घोटातच आपली सुखनैव तंद्री लागते आणि आपण हलकेच डोळे मिटून घेतो आणि सुखाचे हे घोट पुन्हा पुन्हा प्राशन करत राहतो. मला तर नेहमी या गोष्टीचं कौतुक वाटतं की इतके सारे अप्रतिम खमंग अवीट गोडीचे पदार्थ पहिल्यांदा कोणाच्या सुपीक डोक्यातून आले असतील बरं.. खरोखरच भूतकाळातील यापिढीचे अनंत उपकार आहेत आपल्यावर.. त्यामुळे आपली खाद्य संस्कृती आणि खाद्यजीवन हे कसं बहरलेलं आणि टवटवीत आहे कायम साठी.. पियुष ही पारंपारिक महाराष्ट्रीयन आणि तेवढीच ऑथेंटिक रेसिपी आहे. तापलेल्या उन्हाला बाय-बाय करत शरीराला कूल कूल ठेवणारी ही रेसिपी.. जेवढं हे पेय चवदार चविष्ट तेवढेच पौष्टिक बरं का.. उपवासाच्या दिवशी एक ग्लास भरून पियुष प्यायलात तर नक्की चार-पाच तासांची पोटाला विश्रांती..😀.. पियुष मुख्य करून दादर गिरगाव या महाराष्ट्रीयन लोकवस्ती असलेल्या भागातील बऱ्याच मराठी उपहारगृहांमध्ये मिळणारे लोकप्रिय पेय. पणशीकर, तांबे, मामा काणे, प्रकाश, मधुरा, तृप्ती ही काही प्रमुख उपहार गृह.. पण काळाच्या ओघात यातील काही उपहारगृह बंद करावी लागल्यामुळे आमच्यासारख्यांची आली का पंचाईत.. लेकिन डरनेका नही.. डर के आगे हमेशा जीत होती है.. आणि म्हटलंच आहे की गरज ही शोधाची जननी आहे...😊.. आणि यातूनच आलेल्या परिस्थितीवर मात करण्याचा आपल्याला मार्ग सापडतो. आणि तसाच मलाही सापडला आहे.

कुकिंग सूचना
- 1
ताका साठी..
प्रथम दही रवीने घोटून घ्यावे. नंतर दह्यात थंड पाणी घालून पुन्हा एकदा घुसळून घ्यावे. ताक अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. - 2
मोठ्या खोल भांड्यात श्रीखंड, ताक, दूध,साखर, वेलची पूड, जायफळ पावडर,मिल्क मसाला,केशर काड्या...केशर काड्या (थोड्या दुधात उकळून ते दूध गार करुन मग add करा).. एकत्र करुन रवीने घुसळून घ्यावे..किंवा whisker वापरावा..
- 3
मिश्रण कमीतकमी २ तास फ्रिजमध्ये ठेवा. पियुष सर्व्ह करायला तयार..
- 4
सर्व्ह करताना एका ग्लासमध्ये पियुष घालून वर मिल्क मसाला किंवा बदाम पिस्ता काप,केशर काड्या घालूनसर्व्ह करा..सगळे नक्कीच खूप खुश..
- 5
सगळे नक्कीच खूप खुश..
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)