छोले मसाला.. (chole masala recipe in marathi)

#उत्तर
#पंजाब #उत्तरभारतरेसिपीज #छोले
पंजाब ..पंजाब म्हटलं की डोळ्यासमोर येते वाऱ्यावर डोलणारी पिवळीधमक मोहरीची शेती, त्यातील ट्रॅक्टर्स, आणि त्या शेतातून दोन्ही हातांनीओढणीची टोक पकडून वाऱ्यासंगे धावणारी एखादी पंजाबी कुडी सिमरन.. आणि तिच्या मागे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे असं म्हणत धावणारा राज.. तर कधी बल्ले बल्ले केलेला भांगडा आठवतो..उडत्या चालीची गाणी..किती fantasy निर्माण केलीये ना आपल्या मनात या पंजाबने..खरंच पंजाब म्हणजे पाच नद्या,सुवर्णमंदिर,गुरु ग्रंथ साहिबा,गुरु नानक,गुरु गोविंदसिंग,घुमान येथील संत नामदेवांचे १५ वर्षाचे वास्तव्य,भागवत धर्माचा प्रसार,अटक..या अटकेपार पेशव्यांनी लावलेले झेंडे,जालियनवाला बाग, प्रसिद्ध फुलकारी डिझाईन,पंजाबी ड्रेस ,पंजाबी भाषेचा गोडवा,पैरी पौना म्हणत वडीलधार्यांच्या पायाला हात लावून केलेला नमस्कार..या सगळ्याचा खाद्यसंस्कृती वर झालेला परिणाम...मक्के दी रोटी,सरसों का साग,राजमा,पनीर,समोसा छोले,छोले टिक्की,छोला भटुरा,आलू पराठा,बटर रोटी...दुधातुपाचा पूर...नुसता नाव घ्यायचा अवकाश...डोळ्यांसमोर हे पदार्थ आलेच म्हणून समजा..आणि पहिले डोळे आस्वाद घेतात..आणि मग जिव्हां... मग आता सांगा अशा चमचमीत पदार्थांना राज्यांच्या सीमारेषा थोडीच अडवू शकणार???..अजिबात नाही..हे पदार्थ मजल दरमजल करत आपल्या स्वयंपाकघरात येऊन पोहोचले.आणि कधी आपलेच होऊन गेले हे कळलेही नाही..आता छोल्यांचं,पनीरचं ,पराठ्यांचे उदाहरण घ्या....सण, समारंभ,पार्टीज चे हे शान आहेत.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये छोले आणि चणाडाळ घेऊन व्यवस्थित धुवा आणि त्यात चहाची पुरचुंडी घालून छोले रात्रभर भिजत ठेवा.दुसर्या दिवशी चहाची पुरचुंडी काढून टाका..त्यामुळे छोल्यांना सुंदर रंग येतो....कुकर मध्ये या भिजवलेल्या पाण्यासकट छोले, चणाडाळ, मिरे, लवंग आणि तमालपत्र,ओवा,एकत्र करा आणि कुकर मध्ये बेताचे पाणी घालून आणि सोडा घालून सहा ते सात शिट्ट्या करून उकडून घ्या.
- 2
आता एका कढई मध्ये तेल तापवा. त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्या नंतर त्यात टोमॅटो आलेलसूण पेस्ट घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.हे मिश्रण साधारण चार पाच मिनिट शिजवून घ्या.
- 3
नंतर यात धने पावडर गरम मसाला काश्मिरी लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. आणि हे मिश्रण चार पाच मिनिट तेल सुटेपर्यंत परतत रहा.,
- 4
आता यामध्ये उकडलेले छोले घाला आणि पाणी घालून व्यवस्थित ढवळा. तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सी प्रमाणे पाणी घालावे (इथे पाणी गरम घालायचे आहे). निघाला आणि सात ते आठ मिनिट मध्यम आचेवर छोले झाकण ठेवून छान शिजू द्या. नंतर यामध्ये हवी असल्यास आमचूर पावडर घालून छोले परत व्यवस्थित ढवळून घ्या. झाला आपला छोला मसाला तयार..
- 5
आता एका वाटी मध्ये छोले काढून त्यावर कांद्याचे गोल काप, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.हे छोले तुम्ही पराठे,भटूरा,पुरी इतकेच काय तर भाताबरोबर देखील खाऊ शकता.
- 6
- 7
- 8
- 9
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या