दहीवडे (dahi vada recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

दहीवडे म्हटले की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते! दिवाळीचे नेहमीचे फराळ खाऊन झाल्यावर, असेच काहीतरी नाश्त्याला पाहिजे! म्हणून मग आज केले आहेत दहीवडे ! या तर मग दहिवडे खायला...

दहीवडे (dahi vada recipe in marathi)

दहीवडे म्हटले की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते! दिवाळीचे नेहमीचे फराळ खाऊन झाल्यावर, असेच काहीतरी नाश्त्याला पाहिजे! म्हणून मग आज केले आहेत दहीवडे ! या तर मग दहिवडे खायला...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याउडीद डाळ बिन साला ची
  2. 1/2 वाटीबिन साला ची मुगडाळ
  3. 4-5हिरवी मिरची चिरून
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/2 टीस्पूनआले किस
  7. तळण्यासाठी तेल
  8. 500मिली दही
  9. साखर आवडीप्रमाणे
  10. मीठ चवीनुसार
  11. वडे टाकण्यासाठी गरम पाणी
  12. 1 टेबलस्पूनजीरे पूड
  13. वड्यांवर टाकण्यासाठी बारीक शेव,हिरवी चटणी, तिखट मीठ,चाट मसाला, चिंचेची चटणी,कोथिंबीर

कुकिंग सूचना

60 मिनिट
  1. 1

    उडदाची डाळ आणि मुगाची डाळ रात्रभर भिजवून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्यावे. त्यानंतर त्यात आवडीनुसार हिरवी मिरची, आले, जीरे आणि मीठ टाकून एकत्र करावे.चांगले मिक्स करून पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊ. घट्ट दही घेऊन त्यात आवडीप्रमाणे साखर आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. म्हणजे फेटून घ्यावे. आवडत असेल तर त्यात थोडी जीरे पूड टाकावी.

  3. 3

    गॅसवर कढई ठेवून, गॅस सुरू करून तेल तापण्यास ठेवावे. त्यानंतर हाताने किंवा चमच्याने गोल गोल वडे तेलात टाकावे व सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

  4. 4

    हे तळलेले वडे आपल्याला पाण्यात टाकावयाचे आहे. जेणेकरून ते हलके होते. त्यासाठी गरम पाणी घेऊन, त्यात जीरे पावडर आणि थोडेसे मीठ टाकावे, एकत्र करावे. आणि तळलेले तयार वडे त्यात पाच ते सात मिनिटं मुरु द्यावे. त्यानंतर त्यातून पाणी काढण्यासाठी पिळुन घ्यावे व दही वड्याची डिश तयार करावी. त्यासाठी एका डिशमध्ये वडे घेऊन, त्यावर दही टाकावे व आवडीप्रमाणे चाट मसाला, तिखट, मीठ, शेव,हिरवी चटणी, चिंचेची चटणी, कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes