शाही मलाई पनीर (shahi malai paneer recipe in marathi)

शाही मलाई पनीर (shahi malai paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळी सामग्री गोळा करून घ्यावी। आता कांदे, मिरची, तेज पान, बदाम, काजू, मिरे उकळून घ्यावे। दूध गरम करून त्यात केसर घालून मिक्स करून घ्यावे।
- 2
1 कांदा घेऊन लांब बारीक काप करून घेऊन फ्राय करून घ्यावे।
- 3
आता कढई मधे तेल गरम करून त्यात तेज पान, शाह जीरा,अद्रक लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे। आता काजू सोडून बाकी पदार्थाच्ची पेस्ट करून घ्यावी। आणि कढई मध्ये घालून परतून घ्यावी।
- 4
आता काजू, खोवा, बदाम(साल काढून) आणि मलाई घालून पेस्ट करून घ्यावी आणि कढई मधे घालावी।
- 5
आता ग्रेव्ही शिजल्यावर तिला चाळणीने गाळून घ्यावे जेणेकरून एक स्मूथ पेस्ट मिळेल। आता दुसऱ्या भांड्यात तूप घालूम त्यात ही ग्रेव्ही घालावी, मीठ आणि थोडी साखर घालावी आणि पनीर घालून मिक्स करावे।
- 6
आता 3-4 मिनिटे परतून घ्यावे। वरून थोडे पनीर ग्रेट करून घालावे आणि ड्रेसिंग साठी फ्राय केलेला कांदा घालून मिक्स करावे। आपले शाही मलाई पनीर तयार ।
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या