सीता भोग (sita bhog recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#पूर्व #बंगाल
बर्धमान फेमस, ट्रेडिशनल, टेस्टी बंगालची मिठाई आहे.छाना (पनीर )आणि बासमती तांदूळाच्या पिठा पासून बनवतात.

सीता भोग (sita bhog recipe in marathi)

#पूर्व #बंगाल
बर्धमान फेमस, ट्रेडिशनल, टेस्टी बंगालची मिठाई आहे.छाना (पनीर )आणि बासमती तांदूळाच्या पिठा पासून बनवतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 तास
4व्यक्तींसाठी
  1. 1 लिटरदूध
  2. 2 कपसाखर
  3. 2 कपपाणी
  4. 2 टेबलस्पूनतांदुळाचे पीठ
  5. 3-4लवंगा
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर
  7. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात पाणी आणि साखर घेऊन त्यात लवंग आणि वेलची घालून गॅसवर मध्यम आचेवर साखरेचा एक तारी पाक करून घ्यावा.

  2. 2

    पातेल्यात दूध तापवून घ्यावे. त्यात लिंबाचा रस थोडा थोडा घालून दूध फाटऊन घ्यावे.

  3. 3

    फाटलेले दूध रुमालात घेऊन त्यातील पाणी फोटोत दाखवल्या प्रमाणे काढून टाकावे.

  4. 4

    तयार झालेले पनीर प्लेट मध्ये घेऊन चांगले मळून घ्यावे त्यात तांदुळाचे पीठ घालूनगोळा तयार करून घ्यावा. दहा ते पंधरा ओल्या कपड्यानी झाकून ठेवावा.

  5. 5

    कढईत तेल मंद आचेवर गरम करून त्यात गाळणी ठेवून वरून किसणीवर तांदूळ पीठ आणि छाना (पनीर)चा गोळा घेऊन फोटोत दाखवल्या प्रमाणे शेव पाडून तळून प्लेट मध्ये काढून घ्यावी.

  6. 6

    तांदूळपीठ आणि छाना च्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तळून घ्यावे.

  7. 7

    तळलेले शेव व गोळे तयार केलेल्या साखरेच्या घालून मिक्स करून तास ते दीड तास मुरत ठेवावेत. सीता भोग तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes