झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

#KS2
चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄
झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2
चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄
कुकिंग सूचना
- 1
साहित्य
- 2
प्रथम कढई मध्ये, तेल गरम करून कांदा लसूण आलं छान सोनेरी रंगावर परतून घ्या आणि बाजूला ताटात काढून लगेच त्याच कढईत 1 चमचा तेलावर कोरडे मसाले परतून घ्या.
- 3
आता लगेच खोबरं, खसखस छान भाजून घ्या.
- 4
आता कढईमध्ये 3-4 चमचे तेल गरम करून वांगी परतून घ्या, झाकण ठेऊन छान एक वाफ येऊ द्या. म्हणजे नंतर फार शिजवायला लागत नाहीत.
- 5
आता परतलेले सगळे मिश्रण (गार झाले की)कोथिंबीर घालून कमीत कमी पाणी घालून मिक्सर ला बारीक वाटून घ्या.
- 6
आता वाटणात मीठ, जीरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, हळद घालून सगळे साहित्य मिक्स करून वांग्यामध्ये भरून घ्या.
- 7
आता कढईमध्ये तेल घालून गरम झाले की मोहोरी, जीरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करून घ्या आणि उरलेले वाटण घालून चांगले परतून घ्या.
- 8
आता त्यात गोडा मसाला, गूळ घालून मिक्स करून भरलेली वांगी आणि आवश्यक्तेनुसार पाणी घालून छान 8-10 मिनिटे शिजवून घ्या मध्ये मध्ये परतत राहा. वांगी शिजली का हे बघून गॅस बंद करा.
- 9
झणझणीत भरली वांग्याची भाजी तयार झाली.
Keywords
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या