पुणेरी मिसळ...खमंग संस्कृती (misal recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#KS2 #पश्चिम_महाराष्ट्र_रेसिपीज. #पुणेरी _मिसळ

जैसा गाव_वैसी मिसळ...😋

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा एक चविष्ट चवदार चमचमीत खमंग अध्याय..हा अध्याय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतात अगदी भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने वाचला जातो...एवढेच नव्हे तर जगभरात मराठी माणसाचा अत्याधिक आवडीचा अध्याय.. त्यामुळे वरचेवर घराघरात वाचला जातोच..पण जशी प्रत्येक घराची,प्रांताची एक विशिष्ट परंपरा, विशिष्ट चव,खाद्यसंस्कृती आहे...तेथील भौगोलिक परिस्थिती नुसार उपलब्ध पीके ,मसाले यांची गोळाबेरीज करुन प्रत्येक जिल्ह्यानुसार मिसळीची वैशिष्ट्य पूर्ण चव ,मिसळीमधले signature variations आपल्याला पहायला मिळतात.. कोल्हापूरची झणझणीत मिसळ,सातारची तेजतर्रार मिसळ,सांगली सोलापूरची चमचमीत मिसळ तर पुणेरी गोडा मसाला,गूळ घालून केलेली चमचमीत, स्वादिष्ट मिसळ,तर काही वेळेस झटपट मिसळ..असे एक ना अनेक प्रकार रसना तृप्त करायला कायम सज्ज आहेत..ते ही 24×7....मिसळ खायला ठराविक वेळ नसते..असतो फक्त mood..😀म्हणूनच तर मिसळ पाव बस नाम ही काफी है..!!!!!😍😋
चला तर मग आज आपण मिसळीचा पुणेरी अध्याय वाचू या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40मिनीटे
5-6जणांना
  1. 500 ग्रॅममोड आलेली मटकी
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 2मोठे कांदे उभे चिरून
  4. 4टोमॅटो उभे चिरून
  5. 1 टेबलस्पूनआले-लसूण पेस्टट,पाव कप सुके खोबरे
  6. 7-8 कडीपत्त्याची पाने
  7. 2 टेबलस्पून गोडा मसाला आवडीनुसार कमी-जास्त करू शकता
  8. 4 टीस्पूनलाल तिखट
  9. 2 टीस्पून]काश्मिरी मिरची पावडर
  10. 1 टीस्पून गुळ
  11. मीठ चवीनुसार
  12. गरम पाणी
  13. 4 टेबलस्पूनतेल
  14. भरपूर कोथिंबीर बारीक चिरून
  15. कांदा बारीक चिरून
  16. 1/2 टीस्पून फोडणीचे साहित्य मोहरी जीरे हिंग हळद प्रत्येकी
  17. बटाटा भाजीसाठी
  18. 4 उकडलेले बटाटे
  19. 1 टीस्पून आलं लसूण  मििरची पेस्ट
  20. फोडणीसाठी तेल, मोहरी जीरे हिंग हळद
  21. 4-5कडिपत्त्याची पाने
  22. मीठ चवीनुसार
  23. कोथिंबीर
  24. कांदे पोहेसाठी
  25. 1 कप जाड पोहे भिजवून
  26. 1कांदा बारीक चिरून
  27. 3-4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  28. 4-5कडिपत्त्याची पाने
  29. 1 टीस्पून साखर
  30. मीठ चवीनुसार
  31. कोथिंबीर
  32. फोडणीसाठी तेल मोहरी जीरे हिंग हळद
  33. 1/2 इंचआले बारीक चिरून
  34. फरसाण
  35. कांदा कोथिंबीर बारीक चिरून
  36. लिंबाच्या फोडी
  37. लादी पाव किंवा स्लाइस ब्रेड

कुकिंग सूचना

30-40मिनीटे
  1. 1

    प्रथम मटकी चांगली धुवा आणि त्या त पाणी घालून 7-8 तास ठेवा..नंतर चाळणीत उपसून ठेवा आणि मोड आणण्यासाठी त्या चाळणीवर झाकण ठेवा 10-12तासांनी सरसरुन मोड आलेले दिसतील.. जाड पोहे भिजवून ठेवा..एकीकडे बटाटे उकडून त्याचे तुकडे करून घ्या..कढईत तेल घाला..तेल तापले की त्यात मोहरी जीरे हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्यावी कडिपत्ता, मिरचीचे तुकडे,आलं लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्या.. नंतर उकडलेले बटाटे घालून चवीनुसार मीठ साखर घालून भाजी एकजीव करा..तयार झाली मिसळीची भाजी..

  2. 2

    आता त्याच कढईमध्ये तेल तापवावे..तेल गरम झाले की त्यात मोहरी जीरे हिंग हळद घालून खमंग फोडणी करावी..नंतर त्यात कडिपत्ता कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे बारीक चिरलेला आलं,कांदा घालून परतून घ्या..कांदा गुलाबीसर झाल्यावर त्यात पोहे,मीठ,साखर घालून पोहे परतून घ्या..दोन तीन वाफा काढा.. वरून कोथिंबीर घाला..तयार झाले आपले कांदे पोहे..

  3. 3

    आता मिसळीसाठीी कांदा टोमॅटो चिरून घ्यावा..एका कढईत तेल तापवून त्यात कांदा परतून घ्या..त्यात 1टीस्पून आलं लसूण पेस्ट घालून परतावे, खोबरे घालून व्यवस्थित परतून घ्या,नंतर टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या..त्यात काश्मिरी लालतिखट, 2टीस्पूनलाल तिखट घालून मिश्रण एकजीव करावे.गॅस बंद करा.थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    आता कुकर मध्ये तेल गरम करून घ्या..नंतर त्यात मोहरी जीरे हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या.. कडिपत्ता कोथिंबीर घाला..कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या..उरलेलीआलं लसूण पेस्ट घालावी आणि परतून घ्या..आता त्यात वाटलेले वाटण घालून तेलावर छान परतून घ्या..2-3वाफा काढा..मोड आलेली मटकी घालून व्यवस्थित मिक्स करावे.., गरम पाणी घालावे..कारण आपण उसळीचा कट म्हणून पण हाच रस देणार आहोत..तिखट,मीठ,गुळ,गोडा मसाला घालून व्यवस्थित ढवळा..झाकण लावून 2ते 3शिट्ट्या करुन घ्या..झाली आपली चमचमीत उसळ तयार..

  5. 5

    पुणेरी मिसळ सर्व्ह करताना एका डिश मध्ये आधी बटाटा भाजी घाला..त्यावर कांदे पोहे घाला.‌आता उसळीचा थर द्या..यावर फरसाण कांदा कोथिंबीर घाला..वरुन उसळीचा कट गोल फिरवून घाला..सोबत लिंबाची फोड, पावासोबत सर्व्ह करा पुणेरी चमचमीत, लज्जतदार मिसळ..

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes