मराठवाडा स्पेशल कांदा कैरीची (kanda kairichi chutney recipe in marathi)
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
मराठवाडा स्पेशल कांदा कैरीची (kanda kairichi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा. एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, साखर आणि मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. वाटलेला मसाला एका भांड्यात काढून घ्यावा.
- 2
परत एकदा मिक्सरच्या भांड्यात कैरीचा किस, शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेला कांदा आणि अजून थोडीशी कोथिंबीर घेऊन बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात वाटलेला मसाला मिक्स करून घ्यावा.
- 3
छोट्या कढईत तेल गरम करून त्यात जीरे - मोहरी तडतडू द्यावे त्यानंतर त्यात हिंग घालावा. हि फोडणी तयार चटणीवर घालावी. चटणी मिक्स करून घ्यावे. तोंडी लावण्यासाठी ही चटणी सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15079819












टिप्पण्या