बटाट्याच्या क्रिस्पी काचऱ्या (batatachya crispy kachrya recipe in marathi)

#pe
#बटाट्याच्या क्रिस्पी काचऱ्या
बटाटा ही फळभाजी.. घराघरातला बहुपर्यायी पदार्थ...खरच फक्त बटाटा वापरून आपण अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवतोच.. पण इतर अनेक भाजांबरोभरही बटाटा वापरला जातो आणि एकापेक्षा एक सुंदर पदार्थ तयार केले जातात. त्यामुळेच मला तर नेहमी कांदा आणि बटाटा हे घरात असले आणि इतर कोणत्याही भाज्या नसल्यातरी चालते. कारण कांदा, बटाटा बघूनही भरपूर काही आपल्याकडे असल्याची जाणीव होते. असा हा प्रत्येक सुगरणीच्या स्वयंपाकघरातला अविभाज्य घटक....बटाटा... आज मी तुमच्यासाठी बटाट्याचीच एक रेसिपी घेवून आली आहे, बटाट्याच्या क्रिस्पी काचऱ्या....तुम्ही पण नक्की करून बघा...खूपच छान होतात...मुलांनाही चपपटीत खाणं म्हणूनही देवू शकता. चला तर मग बघूया....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे स्वच्छ धुवून पुसून साली काढून घ्याव्यात. व त्याचे चार भाग करून पातळ काप करून पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये ५-६ तास ठेवाव्यात.
- 2
नंतर पाणी काढून चाळणीमध्ये निथळत ठेवाव्यात. साधारणपणे अर्ध्यातासाने स्वच्छ कपड्यावर पसरून ठेवून एक तासभर सुकवून घ्याव्यात.आता कढईमध्ये जरा जास्त तेल ५-६ पळ्या घेवून गरम झाले की त्यामध्ये हे काप घालावेत.व हलक्या हाताने हलवत रहावे नाहीतर काप तुटतात म्हणून सावकाश हलवावे. मध्यम आच ठेवावी.
- 3
हळूहळू ते छान क्रिस्पी होवू लागतात. रंगही बदलू लागतो.लालसर दिसू लागले की तिखट, मीठ व चाट मसाला घालावा. व आणखी थोडे परतावे.
- 4
ब्राऊन कलर येवू लागतो मसालाही सर्वत्र लागतो. आता गॅस बंद करू.एकदम क्रिस्पी होतात. खूपच छान लागतात.मुलांना मधल्यावेळचे खाणं म्हणून उत्तम पर्याय आहे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या