दुधीची  कोफ्ता करी (dudhichi kofta curry recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#GA4
#week10
#kofta
दुधीची भाजी खाण्यासाठी सगळे नाक मुरडत असतात. पण अशाप्रकारे दुधीची कोफ्ता करी केल्यास सगळ्यांना खूप आवडेल...नक्की करून पहा

दुधीची  कोफ्ता करी (dudhichi kofta curry recipe in marathi)

#GA4
#week10
#kofta
दुधीची भाजी खाण्यासाठी सगळे नाक मुरडत असतात. पण अशाप्रकारे दुधीची कोफ्ता करी केल्यास सगळ्यांना खूप आवडेल...नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1मध्यम आकाराचा कोवळा दुधी भोपळा किसून
  2. 4-5 चमचे बेसन पीठ
  3. 5-6काजू पाकळ्या
  4. 4-5लसूणाच्या पाकळ्या
  5. 1 छोटाआल्याचा तुकडा
  6. 1/2 चमचाजीरे
  7. 2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनधणेपूड
  9. 1 टेबलस्पूनगरम - मसाला
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टीस्पूनकसूरीमेथी
  12. 1कांदा बारीक चिरुन
  13. 2टोमॅटो बारीक चिरून
  14. बारीक चिरलेली कोथींबीर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कोफ्त्यासाठी : प्रथम दुधीचे साल काढून दुधी किसणीवर किसून घ्या व त्यामध्ये मीठ घालावे.

  2. 2

    दुधीचा कीस हलकेच पिळून रस काढून घ्या.मग त्या दुधीच्या किसात बेसन, थोडा गरम - मसाला, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून कोफ्ते तयार करून घ्या.

  3. 3

    हे कोफ्ते आप्पे पात्रात कमी तेलात तळून घ्या. हे दूधीचे कोफ्ते चटणीबरोबर किंवा तसेच नुसते खायलासुद्धा छानच लागतात.

  4. 4

    आता करीसाठी कढई मध्ये टोमॅटो, कांदा, आले - लसूण आणी काजू परतून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात हे परतलेले जिन्नस घाला. अगदी थोडेसेच पाणी घालून पेस्ट वाटून घ्या.

  5. 5

    गॅसवर कढईत तेल गरम करा. लवंग, दालचिनी, वेलची, तमालपत्र, जीर्‍याची फोडणी करून त्यात हे वाटण घालून चांगले परतून घ्या. त्यात दूधीचा कीस पिळून काढून घेतलेला रस व आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून ग्रेव्ही कितपत दाट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार कमी-जास्त पाणी घाला.

  6. 6

    मग त्यात हळद, लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, साखर, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

  7. 7

    आता यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम व तयार केलेले दुधीचे कोफ्ते घालावेत आणि एक उकळी आणावी. गॅस बंद करून गरमागरम दुधीची कोफ्ता करी लगेच सर्व्ह करावी.

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes