चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन स्वच्छ धऊन घ्या. चिकनला हळद, तिखट, मीठ अर्धा आल- लसूण पेस्ट,दही लावून ठेवावे. त्याच्यावर लिंबू पिळून मिक्स करावे आणि 3 ते 4 तास फ्रीज मध्ये ठेवून दया
- 2
पुलाव बनवायला सुरुवात करण्या आधी अर्धा तास तांदूळ स्वच्छ धऊन तांदळाच्या वर 2 इंच पाणी येईल येवढया पाण्यात भिजत घालावे 5 कांद्यानं पैकी दोन कांद्याची भाजून व1 टोमॅटोची पीयूरी करून घ्या. 2 पातळ लांब चिरून घ्या. 1 थोडा जाड पण लांब चिरून घ्या.
- 3
हिरवी वेलची, दालचिनी 1 तमालपत्र, 2 लंवगा मिक्सर मधून बरिक करुन घ्या.
- 4
1 टोमॅटो बारीक चिरून घ्या, मिरची लांब चिरून घ्या. चमचा दूधात केशर घालून ठेवा
- 5
कढईत तेल घालून गरम करून घ्या. त्यात पातळ चिरलेले कांदे तळून ते काढून घ्या. त्या तेलात तमालपत्र दालचिनी, लवंग, मसाला वेलची, शाह जीरे घाला. हिरव्या मिरच्या, लांब चिरलेले कांदा घाला
- 6
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटो व चिमूटभर मीठ घालून परतावं बारीक गॅस करून झाकण ठेवावे
- 7
टोमॅटो विरघळला की कांदा- टोमॅटो ची पीयुरी घालून परतावं. आलं लसूण पेस्ट घालून परतावं. हळद, तिखट पुलाव मसाला मैगनेट केलेलं चिकन घालून परतावे व झाकण ठेऊन 15 मिनिट शिजवावे त्यात थोडं गरम पाणी घालून चांगले उकळून घ्या
- 8
तांदूळातिल सर्व पाणी निथळून घ्या. चिकनला उकळी आल्यावर त्यात तांदूळ घाला व परतून घ्या. तांदूळाच्या वर 1 इंच पाणी येईल एवढं गरम पाणी घालून मीठ घालावे व झाकण ठेवावं
- 9
15मिनिटा ने झाकण काढून केशर, कोथींबीर पुदिना तळलेला कांदा घालून झाकण लावून ठेवावे व गॅस बंद करावा. पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या