व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते.

व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)

ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण पाऊण तास
4 जणांसाठी
  1. 2 कपकोबी किसून
  2. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  3. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  4. मीठ
  5. तेल
  6. 1 टेबलस्पूनआले-लसुण पेस्ट
  7. 3 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  8. 3 टेबलस्पूनमैदा
  9. काळी मिरपुड
  10. बारीक चिरलेली लसुण
  11. बारीक चिरलेला कांदा
  12. 1सिमला मिरची चिरून
  13. कांदा पात चिरून
  14. 2 टेबलस्पूनसोया सॉस,व्हिनेगर
  15. 2 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  16. 1 टेबलस्पूनटोमॅटो केचअप
  17. पाणी

कुकिंग सूचना

साधारण पाऊण तास
  1. 1

    सर्वात आधी किसलेल्या कोबीतील पाणी काढून त्यात गरम मसाला, मिरची पावडर, आले-लसुण पेस्ट, 1 चमचा सोया सॉस आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे. (मिठामुळे कोबीला भरपुर पाणी सुटते म्हणून मीठ घालण्या आधीचे सुटलेले पाणी काढून घ्यावे) नंतर त्यात कॉर्नफ्लोअर आणि मैदा समप्रमाणात घालावा. (गरजेनुसार प्रमाण कमी जास्त करावे) साधारण पिठाचे गोळे होतील असे पिठ असावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करत ठेवावे आणि एकीकडे तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावेत. तेल गरम झाले की त्यात गोळे सोडून ते सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.

  3. 3

    दुसरीकडे एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसुण, बारीक चिरलेला कांदा आणि सिमला मिरची घालून परतवून घ्यावे नंतर वर थोडासा पाती कांदा घालून परतावे. त्यावर चिमुटभर मिरपुड घालावी. भाज्या परतत असताना त्यात केचअप, सोया सॉस, चिली सॉस आणि व्हिनेगर घालावे. भाज्या परतल्या गेल्या की त्यात कपभर पाणी घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ घालावे. एका वाटीत 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात पाणी घालून त्याची स्लरी बनवून घ्यावी आणि ती मिश्रणात घालावी. ही मुंचुरीयन ची ग्रेव्ही तयार झाली.

  4. 4

    मुंचुरीयन चे तयार गोळे आता ग्रेव्ही मध्ये घालून वरून कांदा पात घालून सजवून घ्यावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.
    टीप - सोया सॉस आपण वापरत असल्याने मीठ घालताना जपून घालावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

Similar Recipes