लजानिया (lasagna recipe in marathi)

लजानिया (lasagna recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. भाज्या सर्व बारीक चिरुन घ्याव्यात.
- 2
१ सारण - पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल व थोडे बटर टाकावे. गरम झाल्यावर त्यात लसूण टाकून परतावे.
- 3
१ कांदा ट्रान्सपरंट परतून मिरची,कॉर्न, मटार, सिमला मिरची घालून चांगले परतावे. १ टोमॅटोची प्युरी व २ टेबलस्पून टोमॅटो केचप टाकून हलवून घ्यावे. १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, १/२ टेबलस्पून मिक्स हर्ब्स व मीठ घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजू द्यावे. नंतर त्यात १ टोमॅटो बारीक चिरुन घालावा. २ मिनिटांनी गॅस बंद करावा. मिश्रण पातळ करु नये.
- 4
२ सारण - पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल व थोडे बटर टाकून लसूण परतावा. १ कांदा परतून घ्यावा.
- 5
त्यात ब्रोकोली परतावी. पनीर,मीठ टाकून हलवून घ्यावे. किसलेले चीज घालावे व लगेच गॅस बंद करावा.
- 6
टोमॅटो सॉस--पॅनमध्ये १/४ टेबलस्पून बटर टाकून लसूण परतावा. टोमॅटो प्युरी घालावी, १ टेबलस्पून टोमॅटो केचप टाकून मीठ, चिली फ्लेक्स घालून २ मिनिटे शिजू द्यावे. वरुन १/४ टि स्पून ऑलिव्ह ऑइल घालून मिक्स करावे.
- 7
ब्रेडच्या कडा काढून पातळ लाटून घ्यावे. पॅनवर थोडे बटर टाकून गरम करुन घ्यावेत. एका प्लेट मध्ये टोमॅटो चकत्या घेऊन मीठ, थोडी चिली फ्लेक्स, कोथिंबीर व १/४ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालून मॅरिनेटेड करुन घ्याव्यात.
- 8
ब्रेडच्या स्लाइसवर पनीर चे सारण लावून त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून वर टोमॅटोचे सारण लावावे.
- 9
परत पनीर ब्रेड टोमॅटो सारण लावावे थोडा सॉस लावून भरपूर किसलेले चीज घालून मॅरिनेटेड टोमॅटोची चकती ठेवावी. असे दोन लजानिया बनवून घ्यावे.
- 10
पॅनमध्ये टोमॅटोचे सारण थोडे पसरवून त्यावर दोन्ही ब्रेड ठेवून वरुन झाकण ठेवावे. टोमॅटो चे मिश्रण घट्ट असल्यास १ टेबलस्पून पाणी पॅनमध्ये घालावे म्हणजे ब्रेड खालून करपणार नाही. २-३ मिनिटांत तयार. मायक्रोवेव्ह मध्येही चीज मेल्ट होईपर्यंत ठेवून काढून घ्यावे.
- 11
केल्यास लजानिया तसा सोपा पदार्थ आहे. चीजी स्पाईसी चव असलेला पोटभरीचा पदार्थ.
Similar Recipes
More Recipes
- खस्ता चीज काॅर्न समोसा (khasta cheese corn samosa recipe in marathi)
- थ्री इन्ग्रेडियंट तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
- व्हेज चीजी लजानिया (veg cheese lasagna recipe in marathi)
- थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
- थ्री इन्ग्रेडिएंट्स उपवास स्पे.क्रिस्पी नगेट्स (nuggets recipe in marathi)
































टिप्पण्या (4)
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊