लजानिया (lasagna recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#cpm8
#लजानिया-Lasagna-one pot meal

लजानिया (lasagna recipe in marathi)

#cpm8
#लजानिया-Lasagna-one pot meal

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2मध्यम कांदे
  2. 8ब्रेड स्लाइस
  3. 2मोठे टोमॅटो
  4. 1हिरवी मिरची
  5. 1/2 कपउकडलेले कॉर्न
  6. 1/2 कपउकडलेले मटार
  7. 1 कपब्रोकोली चिरुन
  8. 1मध्यम सिमला मिरची
  9. 1 कपकिसलेले पनीर
  10. 1 कपकिसलेले चीज
  11. 1टोमॅटोच्या चकत्या, थोडी कोथिंबीर
  12. १०-१२ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
  13. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  14. मिक्स हर्ब्स किंवा ऑरेगानो
  15. 3चीज क्युब्स्
  16. ऑलिव्ह ऑइल आणि बटर
  17. टोमॅटो केचप
  18. मीठ चवीनुसार
  19. सॉस-१ मध्यम टोमॅटोची प्युरी+३ लसूण+मीठ चिलीफ्लेक्स+टो.केचप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. भाज्या सर्व बारीक चिरुन घ्याव्यात.

  2. 2

    १ सारण - पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल व थोडे बटर टाकावे. गरम झाल्यावर त्यात लसूण टाकून परतावे.

  3. 3

    १ कांदा ट्रान्सपरंट परतून मिरची,कॉर्न, मटार, सिमला मिरची घालून चांगले परतावे. १ टोमॅटोची प्युरी व २ टेबलस्पून टोमॅटो केचप टाकून हलवून घ्यावे. १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, १/२ टेबलस्पून मिक्स हर्ब्स व मीठ घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजू द्यावे. नंतर त्यात १ टोमॅटो बारीक चिरुन घालावा. २ मिनिटांनी गॅस बंद करावा. मिश्रण पातळ करु नये.

  4. 4

    २ सारण - पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल व थोडे बटर टाकून लसूण परतावा. १ कांदा परतून घ्यावा.

  5. 5

    त्यात ब्रोकोली परतावी. पनीर,मीठ टाकून हलवून घ्यावे. किसलेले चीज घालावे व लगेच गॅस बंद करावा.

  6. 6

    टोमॅटो सॉस--पॅनमध्ये १/४ टेबलस्पून बटर टाकून लसूण परतावा. टोमॅटो प्युरी घालावी, १ टेबलस्पून टोमॅटो केचप टाकून मीठ, चिली फ्लेक्स घालून २ मिनिटे शिजू द्यावे. वरुन १/४ टि स्पून ऑलिव्ह ऑइल घालून मिक्स करावे.

  7. 7

    ब्रेडच्या कडा काढून पातळ लाटून घ्यावे. पॅनवर थोडे बटर टाकून गरम करुन घ्यावेत. एका प्लेट मध्ये टोमॅटो चकत्या घेऊन मीठ, थोडी चिली फ्लेक्स, कोथिंबीर व १/४ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालून मॅरिनेटेड करुन घ्याव्यात.

  8. 8

    ब्रेडच्या स्लाइसवर पनीर चे सारण लावून त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून वर टोमॅटोचे सारण लावावे.

  9. 9

    परत पनीर ब्रेड टोमॅटो सारण लावावे थोडा सॉस लावून भरपूर किसलेले चीज घालून मॅरिनेटेड टोमॅटोची चकती ठेवावी. असे दोन लजानिया बनवून घ्यावे.

  10. 10

    पॅनमध्ये टोमॅटोचे सारण थोडे पसरवून त्यावर दोन्ही ब्रेड ठेवून वरुन झाकण ठेवावे. टोमॅटो चे मिश्रण घट्ट असल्यास १ टेबलस्पून पाणी पॅनमध्ये घालावे म्हणजे ब्रेड खालून करपणार नाही. २-३ मिनिटांत तयार. मायक्रोवेव्ह मध्येही चीज मेल्ट होईपर्यंत ठेवून काढून घ्यावे.

  11. 11

    केल्यास लजानिया तसा सोपा पदार्थ आहे. चीजी स्पाईसी चव असलेला पोटभरीचा पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Love itHello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes