थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#cpm5

थालिपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालिपीठ , शिंगाड्याचे थालिपीठ, साबुदाण्याचे थालिपीठ, तांदळाचे थालिपीठ, काकडीचे थालिपीठ , गव्हाचे थालिपीठ सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालिपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे एकत्र करूनही थालिपीठ बनवता येते. असा हा थालिपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो.
सर्व धान्ये, तांदुळ, गहू, ज्वारी एकत्र भाजून पीठ दळून आणावे व वरील साहित्य घालून थालिपीठ करावे. पौष्टीक लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामK-Pra थालिपीठ भाजणी
  2. 1मोठा कांदा लांबा चिरून घ्या
  3. 5-6हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  4. थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
  5. गरजेनुसार कोमट पाणी

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    एका भांड्यात भाजणी. कांदा लांब चिरून घ्या

  2. 2

    भाजणीमध्ये कांदा कोथिंबीर व मिरची घाला

  3. 3

    कोमट पाणी घालून थोडं सैलसर पीठ भिजवून घ्या.

  4. 4

    गॅसवर तवा गरम करत ठेवा. कांद्याला सुरी टोचुन तेलामध्ये बुडवून तव्यावर फिरवून घ्या.

  5. 5

    भिजवलेल्या भाजणीचा गोळा घ्या व तव्यावर पसरवा. त्याला मध्ये थोडी छोटी भोकं करा व बाजूने आणि मधोमध तेल सोडा.

  6. 6

    दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत तळून घ्या.

  7. 7

    सॉस, चटणी किंवा मेयॉनीज बरोबर गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

Similar Recipes