सफरचंद ची जिलेबी (safarchand chi jalebi recipe in marathi)

सफरचंद ची जिलेबी (safarchand chi jalebi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
जिलेबी च पीठ ~
एक वाटी मैदा / ऑल पर्पझ आटा घेऊन त्यात १ - दीड वाटी किंवा गरजेनुसार पाणी मिक्स करणे. त्यात १ चमचा साखर, चिमूटभर खाण्याचा सोडा, किंचित मीठ घालून ढवळून रात्रभर फरमेंट करण्यास ठेवून देणे. - 2
साखरेचा पाक ~ एका भांड्यात १ वाटी साखर, १ वाटी पाणी घेऊन पाक करण्यास उकळत ठेवणे. ५-६ केशर काड्या उकळताना टाकाव्या, म्हणजे केशराचा रंग उतरतो पाकात. अर्धा वाटी पाणी आटलं कि गॅस बंद करून पाक थंड होण्यास ठेवणे. थंड झाल्यावर ५-६ थेम्ब वॅनिला एस्सेन्स टाकून बाजून ठेवून देणे.
- 3
३ छोटी सफरचंदं घेऊन गोलाकार स्लाईस करून घेणे. मधला भाग काढून टाकावा.
- 4
सफरचंद चे स्लाईस जलेबीच्या मिश्रणात घोळवून ठेवणे.
- 5
पॅन मध्ये तेल तापवून कमी ते मध्यम आचेवर जिलेबीच्या पिठात घोळवलेले स्लाईस शॅलो फ्राय करून घेणे. तळलेली सफरचंद ची जिलेबी ताटात घेऊन त्यावर पाकाची धार सोडायची, पूर्ण पाकात बुडवायचे नाहीत नाहीतर जिलेबीचा crunchiness निघून जातो.
खाताना पिस्ता चे तुकडे पसरवून सर्व्ह करणे.
~ सुप्रिया घुडे
Similar Recipes
More Recipes









टिप्पण्या (4)