पाकातिल रवा बेसन लाडु (rava besan laddu recipe in marathi)

ही खुप सोपी व कमी वेळात बनवली जाणारी रेसिपी आहे. मऊ व पौष्टिक लाडू अगदी ४५ मिनिट्स मधे बनतात.
पाकातिल रवा बेसन लाडु (rava besan laddu recipe in marathi)
ही खुप सोपी व कमी वेळात बनवली जाणारी रेसिपी आहे. मऊ व पौष्टिक लाडू अगदी ४५ मिनिट्स मधे बनतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बेसन चाळून घ्या. एका पैन मधे २ चम्मच तुप टाकून रवा खमंग भाजून घ्या. थोड़ा गोल्डन झाला की बाजूला काढ़ून ठेवा.
- 2
आता बेसन भाजून घ्या. उरलेले सर्व तुप पैन मधे गरम करून बेसन छान भाजून घ्या. जेव्हा बेसन खुप हल्का होतो व एकत्र येतो तेव्हा त्याला बाजूला काढुन ठेवा.
- 3
आता एका पॉट मधे पाणी व साखर चा एकतारी पाक बनवा व त्यात केसर वेलचि पुड टाका.
- 4
सर्व घटक एकत्र करा व छान मिक्स करा. त्यात ड्राई फ़्रूट पाउडर टाका. हे मिश्रण ३० मिनीट थंड करा.
- 5
मिश्रण थंड झाले की छान फोड़ून बारीकपाउडर करा. ज़र मिश्रण सूटसुटित झाला असेल व लाडु वळत नसणार तर थोड़े दूध शिम्पळून लाडु वळून घ्या.
- 6
Decoration हे ऑप्शनल आहें. तुम्हीं काजू, बादाम किव्हा पिस्ता लावु शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या