तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)

तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर मटण स्वच्छ दोन वेळा धुऊन घेणे व त्याला हळद मीठ आणि धना पावडर लावून अर्धा तास ठेवून देणे
- 2
आता मटण शिजला टाकण्यापूर्वी एक कांदा बारीक कापून घेणे आणि दोन चमचे खोबरे कोथंबीर व थोडे आले आणि लसून याचे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणे.
- 3
आता पातेल्यामध्ये तेल घालून त्यावर कांदा लालसर रंगावर परतून घेणे त्यातच वरील वाटलेले वाटण घालने. आता त्यात मटण घालून छान परतून घेणे मटण हाय फ्लेमवर छान परतून घेणे व त्यावर ताट ठेवून त्यात पाणी घालने. ताटातील पाणी हळूहळू टाकणे आणि मटण सॉफ्ट शिजवून घेणे. मेडियम फ्लेम वर जवळपास 1 तास लागतो.
- 4
आता तांबडा रस्सा बनवण्यासाठी वाटण करणार आहोत. आता त्या आता त्यासाठी कांदा आणि खोबरे तेलामध्ये तळून घेणे आणि त्यात आले आणि लसूण घालून त्याचे वाटण तयार करणे
- 5
आता मटण चे पीस बाजूला काढून त्याचे मटण फ्राय बनवू शकतो आणि उरलेला स्टॉक रस्सा बनविण्यासाठी वापरणे. पातेल्यामध्ये तेल घालून वरील वाटण छान परतून घेणे आता त्यात काळे तिखट व कांदा लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घेणे नंतर त्यात मटण शिजविलेला स्टॉक घालून घेणे व दहा ते पंधरा मिनिटे उकळून घेणे आपल्या आवडीनुसार वाटण कमी जास्त घालू शकता.
- 6
हा रस्सा भाकरी चपाती किंवा भाता बरोबर छान लागतो.
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या