वडा सांबार (vada sambar recipe in marathi)

वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उडीद डाळ स्वच्छ धुवून कमीतकमी 5-6 तास भिजत घालावी..
- 2
भिजलेली डाळ पाणी न घालता मिक्सर मधून वाटून घ्यावी..
- 3
मग त्यात तांदूळ पीठ, आल्याचे बारीक काप,खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची गरजेनुसार बारीक चिरून त्या बॅटर मध्ये घावी...थोड मीठ घालून चांगले एका दिशेने १५ मिन फेटून घ्यावेत..
- 4
तळण्यासाठी तेल घेऊन ते गरम झाले की मध्यम आचेवर वडे पाडून घ्यावेत..वडे पडताना हाताच्या बोटाना थोड पाणी लावून वडे तळून घेणे..
- 5
एका बाजूला तूर डाळ स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून बारीक चिरलेला कांदा, शेवगा, वांग, बटाटा टोमॅटो हे सगळं एकत्र कुकर मधून शिजवून घेणे..मध्यम आचेवर ५ शिट्या काढून घ्याव्यात..
- 6
आता शिजलेल्या सर्व मिक्स भाज्या असलेल्या डाळीमध्ये लाल तिखट, हळद, मीठ, सांबार मसाला घालून छान मिक्स करून घेणे..आणि सांबाराला वरून तडका द्यावा..त्यामध्ये तेल, मोहरी,जीरे, हिंग, कडीपत्ता, २ लाल सुक्या मिरच्या असाव्यात..वरून फोडणी चा तडका दिल्यावर पुन्हा एकदा सांबार छान मिक्स करून शिजवून घेणे..त्यात चिंचेचा कोळ घालावा आणि थोडासा गूळ..झाला चटपटीत असा सांबार तयार..😋😋
- 7
आता गरमागरम वड्यांवर मस्तपैकी सांबार ओतून सर्व्ह करावे..
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या