पावटा (वाल) भात (Pavta bhat recipe in marathi)
#EB11 #W11
वाल म्हणजे आमच्या देशस्थ घरातील आवडीचे कडधान्य... वाल घालून केलेल्या अनेक भाज्यांचे प्रकार मी एफबी वरच्या माझ्या वालपुराण या लेखात दिले आहेत. असाच पट्कन होणारा हा एक पदार्थ. कधी कधी काहीतरी साधे पण चविष्ट हवे असते तेव्हा हा वाल भात एक चांगला पर्याय आहे. मी बरेच वेळा हा कुकरमध्येच ( प्रेशर पॅन) करते.

कुकिंग सूचना
- 1
प्रेशर पॅन गॅस वर ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यात तेल, जीरे, हिंग, कडीपत्ता, मिरच्या व थोडी हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात सोललेले वाल घालून १-२ मिनिट परतून घ्यावे म्हणजे त्याचा हरवस पणा कमी होतो.
- 2
नंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून ते पण थोडे परतून घ्या. मग त्यात गरजेनुसार पाणी घालून तिखट,मीठ, गोडा मसाला घालून वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कुकर बंद करा आणि नुसत्या वाफेवर किंवा दोन शिट्या काढून शिजवा. गरम गरम भात पापड, लोणचे बरोबर सर्व्ह करा.सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या