व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

#EB12
#W12
व्हेज मराठा म्हणजे मलई कोफ्त्याच्या फॅमिली मधला पदार्थ म्हणावा लागेल😁😁मलई (पनीर) ऐवजी भाज्या एवढाच measure फरक आहे.. लहान मूल किंवा कोणीही वेगवेगळ्या भाज्या खात नसतील त्यांना अशी रेसिपी करून दिली की संपवतील..हल्ली restaurant मध्ये व्हेज मराठा मोठ्या प्रमाणात मिळत आहे..चला मग रेसिपी पाहुयात 😊

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बॉल्स साठी गाजर, कोबी आणि कोथिंबीर बारीक करून किंवा किसून त्यात आले लसूण पेस्ट घालावी. त्यात मग सगळे मसाले आणि तिखट मीठ घालून मैदा, कॉर्नफ्लोअर घालून अगदी थोड पाणी घालून त्याचे चपटे गोळे करावेत. आणि छान गरम तेलात तळून घ्यावेत.
- 2
आता ग्रेव्ही साठी प्रथम पॅन मध्ये थोड तेल घेऊन त्यात कांदा परतून घ्यावा..मग आले लसूण घालून परत एकदा परतावा.मग त्यात टोमॅटो आणि काजू घालून परतावे. हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे.
- 3
आता त्याच पॅन मधे ३ टेबलस्पून तेल घेऊन त्यात वाटलेला मसाला घालून छान परतावे. मग त्यात सगळे मसाले टाकून परतून घ्यावे..मग त्यात लागेल तसे गरम पाणी घालावे. ग्रेव्ही घट्टसर असावी..मग त्यात वरील भाज्यांचे गोळे घालून, परतून झाकण लावून एक वाफ काढावी..तयार डिश नान,पुरी किंवा जीरा राईस सोबत मस्त लागते.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)