बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये १ कप बेसन घेऊन त्यात १/२ चमचा हळद, १ चमचा मीठ, आणि १ चमचा तेल घेऊन ते आधी सर्व एकत्र करून घेणे.आता त्यात थोडे थोडे पाणी घालून ते स्मूद ब्लाटर करून घ्या. आता त्या वर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या.
- 2
आता बटाट्याची भाजी करून घेऊयात. प्रथम बटाटी उकडून घ्या. आता एका कढईत तेल गरम करून त्यात १/२ चमचा राई घालून ती तडतडल्यावर त्यात कडीपत्ता पाने, १ चमचा अल+ मिरचीचा ठेचा आणि १/२ चमचा हळद घालून ते थोडे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात उकडलेली बटाटी कूसकरून घालून आणि चवीनूसार मीठ घालून ते सर्व एकत्र छान ३ मिनिटे परतून घ्या.आता त्यात कोथिंबीर बारीक कापुन घाला.आता ३ मिनिटांनी गॕस बंद करून ती भाजी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
- 3
आता सांबर बनवून घेऊयात. प्रथम कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आता त्यात सूख खोबर खिसलेल घालून त्यात ४ लहसून पाकळ्या घालून ते छान २ मिनिटे परतून घ्यावे. आता गॕस बंद करून ते थंड करून घ्या. आत मिक्सरच्या भांड्यात थंड केलेला कांदा, लहसून, सूख खोबर याचे मिश्रण घालून त्यात थोडी कोथिंबीर घालून ते वाटून घ्यावे.
- 4
आता त्याच कढईत थोडे तेल गरम करून त्यात ते वाटण घालून त्यात १ चमचा लाल तिखट, २ चमचे सांबर मसाला आणि चवीनूसार मीठ घालून ते ३ते ४ मिनिटे परतून घ्या.आता त्यात १ ग्लास गरम पाणी घालून ते ५ मिनिटे ढवळावे.आता ५ मिनिटांनी गॕस बंद करा. सांबर तयार आहे.
- 5
आता एका कढईत वडे तळण्यापूरताच तेल गरम करून घ्यावे.आता ते बेसनचे ब्लाटर घेऊन त्यात चिमूटभर सोडा घालून ते छान ढवळून घ्या. आता त्यात बटाटा भाजीचा एका चपटा गोळा करून त्या बेसनाच्या ब्लाटरमध्ये बुडवून तो तेलात सोडून द्या.आता दोन्ही बाजूंनी तळून घ्या. बटाटा वडा तयार आहे.
- 6
आता शेवटी एका प्लेट मध्ये आणि थोडे सांबर घालून त्यात बटाटे वडे घालून परत त्यात थोडे वड्यांवर सांबर घालून थोडी सजावट करावी.
- 7
अश्या प्रकारे चमचमीत आणि झणझणीत (बटाटा वडा सांबर) तयार आहे... तर असेच सर्व थंडीच्या दिवसांत मस्त खा आणि छान रहा.....
Similar Recipes
More Recipes






टिप्पण्या (5)