हरियाली तंदुरी चिकन (Hariyali tandoori chicken recipe in marathi)

Rashmi Joshi @Rashmij21
हरियाली तंदुरी चिकन (Hariyali tandoori chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.चिकन ला थोडे स्लीट्स करून घ्यावे. हळद व मीठ लावून 10 मिनिटे ठेवावे.
- 2
मॅरीनेशन साठी हिरवी चटणी करण्यासाठी मिक्सर पाॅट मध्ये लसूण पाकळ्या, आलं, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस व मीठ घालून मिक्सरमधून थोडी दाटसर बारीक करून घ्यावी.
- 3
एका भांड्यात हिरवी चटणी, घट्ट दही,तंदुरी मसाला, धणे पावडर, तेल व मीठ घालून एकत्र करुन घ्यावे व त्यात चिकन घालावे. चिकन ला सगळं मॅरीनेशन लावून 5-6 तास ठेवून द्यावे. शक्य असल्यास 10-12 तास ठेवले तर छान मुरतं.
- 4
मी barbecue मध्ये ग्रील करून घेतले. मध्ये मध्ये थोडे बटर घातले की छान moist होते चिकन.30-35 मिनीटे लागतात पूर्ण ग्रील होण्यासाठी.
पॅन /microwave/ air fryer मध्ये पण छान ग्रील होते.
कांदा, लिंबू सोबत सर्व्ह करावे.
गार्लिक नान बरोबर उत्तम लागते.
Similar Recipes
More Recipes
- रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
- ब्रोकोली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
- लिंबाच्या लोणचे उपवासाचे.(Limbache lonche upvasache recipe in marathi)
- पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi)
- टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16013978





टिप्पण्या