साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा रात्री भिजत घाला कमीत कमी पाच ते सहा तास साबुदाणा चांगला भिजला पाहिजे
- 2
साबुदाणा चांगला भिजल्यावर त्यात उकळून मॅश केलेला बटाटा, दाण्याचं कूट, आलं मिरचीचा ठेचा, जीरे, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्यावे
- 3
सर्व एकत्र मिक्स केल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोल चपटे वडे तयार करून घेणे
- 4
आता एका कढईत तूप तापत ठेवणे तूप तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात वडे सोडावेत.
- 5
वडे मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावे
- 6
वडे तळून झाल्यावर टिशू पेपरवर काढून घेणे वडे गोड दह्यासोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16367227












टिप्पण्या