झटपट मटकी भेळ (Matki Bhel Recipe In Marathi)

दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊन झाले की जिभेला काहीतरी चमचमीत खाण्याचे वेध लागतातच आणि अशा वेळेस फारसा कुटाणा न घालता, जास्त तामझाम न करता काहीतरी झटपट होणारे, त्याचबरोबर जीभेचीही इच्छा पूर्ण करणाऱ्या पदार्थांची मेंदूमध्ये येरझार्या सुरू होतात आणि मग अशातूनच एखादी चटपटीत रेसिपी अवतरते आणि आपल्या जीवाचे ,जिभेचे समाधान करते . आपला तर एकच फंडा..खाना और प्यार से खिलाना..😍 तर आज कुक विथ कुकर या चॅलेंजमध्ये झटपट ,चटपटीत, रंगेबिरंगी मटकी भेळ जी मी एका प्रवासादरम्यान खाल्ली होती तशीही करून आपल्या जिभेची रंगत वाढवली आहे.😜

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमवून घ्या. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून ठेवा आलं-लसूण पेस्ट तयार करा.
- 2
प्रेशर पॅनमध्ये तेल तापत ठेवा. तेल तापले की मोहरी जीरे, हिंग हळद घालून खमंग फोडणी करा.नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट व खोबरे घालून चांगले परतून घ्या.नंतर त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या.
- 3
आता कढीपत्ता व टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या. टोमॅटो पूर्ण शिजले की त्यात दोन्ही तिखट, गोडा मसाला,कांदा लसूण मसाला घालून छान परतून घ्या.
- 4
नंतर वरील शिजलेल्या मसाल्याच्या मिश्रणावर मोड आलेली मटकी घालून मिश्रण एकजीव करा.आता यामध्ये गरम पाणी घालून उसळ चांगली ढवळून घ्या.नंतर यामध्ये मीठ व गूळ घालून एकत्र करा.
- 5
नंतर कोथिंबीर घालून प्रेशर पँनचे झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्या.
- 6
प्रेशर पँनचे झाकण पडले की या मटकीच्या उसळीवर पुन्हा खोबरं कोथिंबीर घालून एकत्र करा.
- 7
आता एका बाऊलमध्ये मटकीची उसळ घालून त्यावर फरसाण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू घालून सर्व्ह करा. तयार झाली आपली चमचमीत आणि झटपट होणारी मटकी भेळ..
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)