बसंती पुलाव/ मिष्टी पुलाव (Basanti Pulao Recipe In Marathi)

बसंती पुलाव हा बंगालमधील एक प्रसिद्ध गोडाचा पदार्थ. हा पुलाव वसंत पंचमीला, देवी सरस्वती मातेला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. अतिशय झटपट होणारा या पुलावची रेसिपी पाहूया.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
- 2
नंतर त्यामध्ये प्रमाणातील अर्धे तूप, हळद, साखर आणि मीठ घालून छान एकत्र करून १/२ तास झाकून ठेवा.
- 3
तूप गरम करून त्यात सर्व खडे मसाले घालून परतून घ्या.
- 4
आता त्यात काजू आणि मनूके घालून छान फुलेपर्यंत परतून घ्या.
- 5
आता भिजवलेला तांदूळ घालून छान एकत्र करा.
- 6
दुधामध्ये भिजवलेले केसर घाला.
- 7
२ कप पाणी घालून छान मिक्स करून वाफेवर भात शिजवून घ्या.
- 8
भारतामधील पाणी आटले की त्यात हिरवी मिरची घाला आणि पुन्हा एक वाफ काढा.
- 9
सरस्वती देवीला नैवेद्य दाखवून, कुटुंबासोबत या बसंती पुलावचा आस्वाद घ्या!
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या