गावरान पातीचा झुणका (Gavran Paticha Zunka Recipe In Marathi)

#GR2 गावरान रेसिपी मस्त थंडीचे दिवस.. खेड्यांमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिळत नाहीत. शेतात कांदापात, हरभरा, शेवगा,पालक, कोथिंबीर अशा भाज्या जास्त प्रमाणात उगवतात. मी येथे झटपट होणारा टेस्टी झणझणीत पातीचा झुणका तयार केला. त्याबरोबर भाकरी किंवा पोळी लोणचे, कांदा घेऊन सेवन करतात. अत्यंत साधे सुटसुटीत असे त्यांचे जेवण असते. यातच ते समाधान मानतात. कमी वेळात कमी सामग्रीत हा झणझणीत कांदापातीचा झुणका तयार केला... चला तर पाहूयात काय सामग्री लागते ते....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदापात स्वच्छ धुवून घ्या. ती कोरडी झाल्यावर ती चिरुन घ्या.
- 2
गॅसवर कढईत तेल टाका. गरम झाल्यावर त्यात मोहरी, जीरे, टाका.नंतर त्यात लसणाची भरड टाकून परतून घ्या. लगेचच तिखट किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट,हळद चिरलेला कांदापात टाकून परतून झाकून ठेवा
- 3
थोडेसे वाफल्यावर त्यात पाऊण वाटी पाणी टाका. खमंग घमघमाट वास सुटतो. पाणी उकल्यावर त्यात डाळीचे पीठ टाकून परतून घ्या.व 3- 4 मिनिटे झाकून ठेवा.नंतर त्यात दाण्याचे कूट व चवीपुरते टाका सणसणीत वाफ येवू द्या. 2-3 मिनिटाने गॅस बंद करा.
- 4
आपला झणझणीत पातीचा झुणका तयार …. पातीचा झुणका त्या सोबत भाकरी किंवा पोळ्या चटणी,लोणचे, कच्चा कांदा घेवून सेवन करतात. तुम्हालाही नक्कीच आवडेल …तर करुन पहाणार ना ?
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)