कारल्याचे वडे

लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.
कारल्याचे वडे
लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.
कुकिंग सूचना
- 1
डाळ स्वच्छ धुऊन,रात्रभर भिजत ठेवणे किंवा सात-आठ तास तरी डाळ भिजली पाहिजे.
कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. कारले उभे चिरून त्यातील सर्व बिया काढून घेणे.किसनीने किसून घेणे.
मिक्सरच्या भांड्यात निथळून घेतलेली हरभऱ्याची डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या,आल्याचे तुकडे घालून पाणी न घालता जाडसर बारीक वाटून घ्यावे. - 2
डाळीचे वाटलेले मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ व सर्व मसाले घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करणे. वरून अर्धा लिंबू पिळून घेणे.
- 3
गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.हव्या त्या आकाराचे वडे,छोटासा गोळा घेऊन, हातावर थापून घेणे. कढईत बसतील तेवढे वडे घालून घेणे.दोन्ही बाजूने छान लालसर तळून घेणे.
- 4
अशाप्रकारे सर्व वडे व्यवस्थित तळून घेणे.
हे वडे टोमॅटो केचप,हिरवी चटणी याबरोबर किंवा नुसते ही खाऊ शकतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या