काजू-पनीर मसाला

#पनीर
पनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी...
काजू-पनीर मसाला
#पनीर
पनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी...
कुकिंग सूचना
- 1
पॅनवर तेलात पनीरचे तुकडे तळून घ्या, बाजूला काढा. त्याच पॅनवर ३/४ कप काजू फ्राय करून बाजूला काढा. १/२ कप काजूत गरम पाणी ओतून बाजूला ठेवा.
- 2
कढईत तेल व बटर घालून सर्व खडे मसाले घाला. त्यावर चिरलेला कांदा घालून ब्राउन होईपर्यंत परता, नंतर आलं लसूण पेस्ट व टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता. आता सर्व मसाले घालून झाकण ठेवून शिजवा.
- 3
भिजवलेल्या काजूची पेस्ट करून त्यात घाला. मीठ, फ्राय केलेले पनीर, काजू घाला. त्यावर फ्रेश क्रीम फेटून घाला. ५ मिनिटे शिजवा.
- 4
कसुरी मेथी, कोथिंबीर घाला.
सर्व्ह करा काजू पनीर मसाला...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या