अंडा बटर मसाला
#अंडी
आज अंड्याचा वेगळा प्रकार म्हणून मी ही रेसिपी केली.
कुकिंग सूचना
- 1
पेस्टसाठी : मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, लसूण पाकळ्या, आलं, काजू, कोथिंबिरीच्या काड्या, हिरवी मिरची, तिखट, धने जिरे पावडर घालून पेस्ट करून घ्या
- 2
पॅनमध्ये तेल, बटर, हळद, तिखट, मीठ घालून त्यावर उकडलेली अंडी फ्राय करून बाजूला काढा
- 3
त्याच पॅनमध्ये बटर, तेल घालून जिरे, दालचिनी, हिरवी वेलची, लसूण पाकळ्या चिरलेल्या, आलं चिरलेलं, हिरवी मिरची चिरलेली, कांदा चिरलेला घालून परतून घ्या. कांदा ब्राउन झाला की त्यात तिखट, हळद, चिमूट साखर घालून हाताने पाणी शिंपडा व एक मिनिटे शिजू द्या. नंतर टोमॅटोची ग्रेव्ही घालून १५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
- 4
मिश्रण बाजूने सुटू लागलं की त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. आता उकडलेली अंडी, बटर, गरम मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर, फ्रेश क्रीम घालून २ मिनिटे शिजवा
- 5
तयार आहे अंडा बटर मसाला....
Keywords
Similar Recipes
More Recipes





टिप्पण्या