शाही पुरण पोळी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून ती पंधरा मिनिटे झाकून ठेवा. नंतर ती कुकर मध्ये वाफवून घ्या.
- 2
मऊसर शिजली कि मग गाळुन पाणी काढुन टाका. मग डाळीत गुळ व साखर घालून घ्या. ते मिश्रण घट्ट होईपर्यंत सारखे सारखे ढवळून घ्यावे नंतर ते चाळनी मधुन गाळुन घ्या. पुरण एक सारखे करून घ्या.
- 3
नंतर त्यात खवा घालून ते मिश्रण तयार करून त्यात चमचा उभा राहिला पाहिजे ईतके घट्ट हवे.
- 4
नंतर त्यात काजू बदाम पुड घालावी व केसर चे दुध घालुन गोळा करणे. एकीकडे गव्हाचे पीठ आणि मैदा घ्या.
- 5
त्या मधे तेल घालून व मिठ लावून त्यावर दुध आणि पाणी घालून ते मळून घ्या. नंतर पंधरा मिनिटे झाकून ठेवा
- 6
पारी करून घ्या त्यात पुरण घालून घ्या व नेहमी प्रमाणेच सुंदर पोळी लाटून त्यावर तुप घालुन छान भाजुन घ्यावी..
- 7
दोन्ही बाजूला तुप लावुन भाजुन घ्यावी अन मग सर्व्ह करा..... तयार आहे चविष्ट अशी खमंग शाही पुरण पोळी.. 😊
Keywords
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या