वरण फळ / डाळ-ढोकळी
#लॉक डाऊन
कुकिंग सूचना
- 1
ढोकळी साठी : गव्हाच्या पिठात बेसन, हळद काश्मिरी मिरची पावडर,धने जिरे पावडर,ओवा,चिमुटभर साखर आणि थोडेसे मीठ घालून नीट मिक्स करून घ्या. १ टीस्पून तेल घालून थोडेथोडे पाणी घालून नीट चांगल्याप्रकारे मळून घ्या. एक अर्धा तास पीठ झाकून ठेवा म्हणजे छान मुरेल.
- 2
आमटीसाठी : कुकर मध्ये तीनही डाळी चिमूटभर हिंग घालून शिजवून घ्या.डाळ शिजली कि घोटून घ्या त्यात ६ ते ७ कप पाणी घाला.आता पातेल्यात तेल गरम करून जिरे,मोहरी कढीपत्त्याची खमंग फोडणी करून टोमॅटो जरासा शिजवून आमटी बारीक गॅसवर ठेवून त्यात एका लिंबाचा रस आणि साखरही घाला. ही आमटी बर्यापैकी आंबट गोड छान लागते.
- 3
तोपर्यंत पीठाचे गोळे करून पोळी लाटून घ्या आणि सुरीने शंकरपाळ्याच्या आकारात कापून घ्या. पोळी जास्त पातळ लाटायची नाही. कापलेल्या शंकरपाळ्या म्हणजेच ढोकळी उकळत ठेवलेल्या आमटीत सोडून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.आमटी थोडी पातळ करा कारण ढोकळी गव्हाच्या पिठाची असल्याने नंतर आमटी घट्ट होते.
- 4
बाउल मध्ये वरती तूच घालून गरम-गरम डाळ-ढोकळी भाजलेल्या कोथिंबीर भुरभुरून पापडा बरोबर आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या