झटपट रवा ढोकळा

#रवा
लॉकडाऊन मुळे सगळे घरात आहेत मग 'काहीतरी वेगळं कर ना ग आज नाश्त्याला' ही भुणभुण आमच्या पतिराजांची... अस्मादिकांना आधीच मुखपुस्तिकांचे आव्हान ( फेसबुक चॅलेंज) काय कमी होते त्यात या एका चॅलेंज ची भर.. आणि आपल्या समुदाय व्यवस्थापक (कम्युनिटी manager) Ankita आहेतच... त्यांचे रवा रेसिपी चॅलेंज... सगळ्यांचा सुवर्णमध्य साधून बनवलेली झटपट रवा ढोकळा रेसिपी... मस्तच झाली आणि ५ मिनिटांत गट्टम् ही झाली...

कुकिंग सूचना
- 1
आधी रवा आणि दही एकत्र करून घ्या, त्यात गरजे नुसार थोडे पाणी घाला.
- 2
हे मिश्रण एकत्र करून २० मिनिटे बाजूला झाकून ठेवून द्या.
- 3
आता त्यात २ मिरच्या, आले, लसूण याची पेस्ट घाला. २ चिमूट बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घाला. सगळे एकत्र नीट मिक्स करून घ्या. हवे असल्यास थोडे पाणी घाला. मिश्रण जास्त सैल होऊ देऊ नका.
- 4
इडली पात्रातील प्लेट्स घेऊन त्यांना तेलाचा हात लावून घ्या आणि त्यात हे मिश्रण टाकून नीट पसरवून घ्या. हवे असल्यास वरून थोडी मिरची पूड भुरभुरून घ्या.
- 5
आता ह्या प्लेट्स इडली पात्रात ठेवून / किंवा मोठ्या भांड्यात ठेवून १० मिनिटे वाफवून घ्या. छान स्पाँजी होईल.
- 6
थंड झाल्यावर त्यांचे आवडीनुसार काप करा. यात टीप अशी की प्लॅस्टिकची सुरी वापरा. मस्त काप होतात.
- 7
एका भांड्यात राई, जिरे, हिंग,कढीपत्ता याची कडकडीत फोडणी द्या. त्यात १०-१५ मिली पाणी घालून चांगली उकळी घ्या.
- 8
आता वरील फोडणी तयार झालेल्या ढोकळाच्या तुकड्यांवर टाका. चटणी बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या