पोहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे चाळणीत घेऊन पाणी घालून भिजवून घ्यावेत. पोहे निथळत ठेवावेत. कांदे, बटाटे सोलून घ्यावेत. कांदे जाडसर चिरावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत. बटाट्याच्या लहान फोडी कराव्यात. कोथिंबीर बारीक चिरावी.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात राई-जिऱ्याची फोडणी करावी. त्यात हिंग, मिरच्या व कडीपत्ता घालून वर कांदा घालावा. त्यावर बटाटी व मटार घालून गॅस मंद करून एक वाफ काढावी.
- 3
मटार व बटाटा अर्धकच्चा शिजल्यावर त्यात हळद, थोडे मीठ घालून ढवळावे. बटाटा व मटार पूर्ण शिजल्यावर त्यात साखर व मीठ घालून मिक्स करावे. त्यात भिजवलेले पोहे घालून एकसारखे करून घ्यावे.
- 4
तयार पोह्यांना दणदणीत वाफ येऊ द्यावी. लिंबू पिळून एकसारखे करावे. गरमागरम पोहे वरून ओले खोबरे व कोथिंबीरीने सजवून खायला द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12165520













टिप्पण्या