रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॉम बारीक रवा
  2. 1 टेबल स्पूनमैदा
  3. 1/2 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनतेल
  5. ५० मीली गरम पाणी
  6. 5 टेबल स्पूनकोथिंबीर
  7. 1/२ टीस्पून डींकाच पाणी
  8. हिरवी चटणी
  9. २१/२ टेबल स्पून पुदिना
  10. 1 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/2 टीस्पूनजिरे पूड
  12. 1 टीस्पूनकाळ मीठ
  13. 2-3काळी मिरी
  14. 2हिरव्या मिरच्या
  15. 3/4 इंचआलं
  16. 1/2लींबू रस
  17. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  18. 1/4 टीस्पूनहिंग
  19. 1 टीस्पूनसाखर
  20. गोड चटणी
  21. ५० ग्रॉम चींच
  22. 7-8खजूर सीडलेस
  23. १०० ग्रॉम गुळ
  24. 1/2 टीस्पूनतिखट
  25. 1 टीस्पूनचाट मसाला
  26. 1 टीस्पूनकाळ मीठ
  27. 1/2 टीस्पूनजिरे पूड
  28. 2उकडलेले बटाटे
  29. ५० ग्रॉम खारी बुंदी (घरी बनवलेली)
  30. 1 टेबल स्पूनपाणी पुरी मसाला (घरी बनवलेेला.)
  31. 4 टेबल स्पूनहरबरे रात्रभर भिजवलेले
  32. 2 टेबल स्पूनमूग रात्रभर भिजवलेले
  33. ५० ग्रॉम शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    रवा मैदा मीठ सर्व मीक्स करून घेतले मग त्यात डींकाचे पाणी मीक्स करून गरम पाणी घालून घट्ट गोळा भिजवून मळून २० मीनीट झाकून ठेवला.

  2. 2

    मग गोळ्याची पातळ पोळी लाटून झाकणाने लहान लहान पुऱ्या कट केल्या.पुऱ्या जरा लहान असल्यामुळे खायला चांगले पडते.मग तय्यार पुऱ्या मंद गॅसवर कढईत तेल गरम करून तळून घेतल्या.

  3. 3

    हिरव्या चटणी साठी कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या आले काळ मीठ साखर जीरे पावडर चाट मसाला मीरे हिंग आमचूर पावडर लींबू रस सर्व साहित्य घालून मीक्सरवर वाटून घेतले.मग काढून त्यात २-२१/२ ग्लासपाणी घातले.गरज वाटल्यास थोडे साधं मीठ मीक्स करणे. बुंदी करण्यासाठी बेसन मीठ तेल मीक्स करून चांगले ५-७ मी नीट फेटून बुंदी पाडली.

  4. 4

    गोड चटणी साठी चींच खजूर व गुळ एक कप पाणी घालून ४-५ मी नीट शिजवून घेतले. थंड करून मिक्सरच्या जारमधे घालून त्यात तिखट काळमीठ जीरे पूड थोडं साधं मीठ घालून बारीक वाटून घेतले.गरजेनुसार पाणी मीक्स केले.

  5. 5

    बटाटे स्मॅश करून त्यात तीखट मीठ चाट मसाला कोथिंबीर घालून मिक्स करून घेतले.हरबरे वमुग हळद मीठ घालून शिजवून घेतले.व थंड करून त्याला तीखट मीक्स केले.२ टीस्पून पुदिना पावडर १/२ सायट्रिक ऍसिड ११/२ टेबल स्पून काळमीठ १/२ टीस्पून साखर १ टेबल स्पून आमचुर पावडर सर्व मीक्सरवर बारीक करून पाणी पुरीचा मसाला तयार केला.

  6. 6

    आता ३कप हिरवी चटणी (ती जास्त पातळ असते) १ कप गोड चटणी व १ टेबल स्पून चाट मसाला सर्व मीक्स करून पाणी पुरीचे पाणी तयार केले.मग प्रत्येक पुरीला वर होल पाडून त्यात हरबरे मुग बटाट्याचे मिश्रण बूंदी शेव व पाणी पुरी चे पाणी घालून डीशमधे ठेवून सजावट करून सर्व्ह केले.

  7. 7

    एकदम चटपटीत अशी पाणीपुरी तयार झाली. अगदी आंबट गोड तिखट सर्व चवीनुसार अगदी मस्त लागत होत्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes