बार्बेक्यू इडली
#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा
बार्बेक्यू इडली
#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ तांदूळ पाच तास भिजत ठेवणे त्यानंतर डाळ आणि तांदूळ मिक्सर मधून वाटून घेणे. मग ते वाटण पाच ते सहा तास ठेवणे...म्हणजे ते पीठ छान अंबते..आणि त्याचा इडल्या खूप छान होतात...खरे पाहिले तर इन्स्टंट इडली पेक्षा अशी उबवलेली इडली खाण्यास फायदेशीर आहे हे
- 2
मग इडली चे बॅटर मध्ये मीठ घालून ते पीठ इडली पात्रात घालून इडली करून घ्या
- 3
तयार इडली चे काप करून घ्या...एका भांड्यात दही, मेयोनीज सॉस व सारे मसाले घालून एकजीव करून घ्या. तुकडे केलेले इडलीचे काप
व भाज्या त्या मसाल्यात अर्धा तास मॅरीनेट करून ठेवा - 4
त्यानंतर एका स्टिक ल पहिल्यांदा कांदा, सिमला मिरची, इडली चे काप परत कांदा, सिमला,मिरची इडली चे काप लावा. तव्यावर थोडे बटर टाकून ती स्टिक शॅलो फ्राय करून घ्या
- 5
लाल चटणी साठी वरील सारे साहित्य मिक्सर मधून वाटून घ्या
- 6
हिरव्या चटनिसाठी सारे साहित्य घालून मिक्स मधून वाटून घ्या...यात तुम्ही पुदिना सुद्धा घालू शकता..मला पुदिन मिळाला नसल्यामुळे मी घातला नाही
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या