बार्बेक्यू इडली

स्वाती सारंग पाटील
स्वाती सारंग पाटील @cook_20942581
नाशिक

#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा

बार्बेक्यू इडली

#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीतांदूळ
  2. 1 वाटी उडीद डाळ
  3. चवीनुसारमीठ
  4. 1 वाटीकांदा, लाल हिरवी सिमला मिरची मोठी चिरलेली
  5. मरिनेशन साठी
  6. 1 टेबल स्पूनतिखट
  7. 1 वाटीदही
  8. 1/2 वाटी मेवोनिस सॉस
  9. 1 टेबल स्पूनधने जिरे पूड
  10. 1 टेबल स्पूनगरम मसाला
  11. 1 टेबल स्पूनहळद
  12. 1 टेबल स्पूनआले लसूण पेस्ट
  13. 1 टेबल स्पूनचाट मसालाा
  14. लाल चटणी साठी
  15. 1/2ओले खोबर
  16. 3 टेबल स्पूनभाजलेले हरभरा डाळ
  17. हिरवी चटणी साठी
  18. 1/2 वाटीकोथिंबीर
  19. 1/2ओले खोबरे
  20. 3 टेबल स्पूनभाजलेले हरभरा डाळ
  21. 1 टी स्पूनजिरे
  22. आले

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम डाळ तांदूळ पाच तास भिजत ठेवणे त्यानंतर डाळ आणि तांदूळ मिक्सर मधून वाटून घेणे. मग ते वाटण पाच ते सहा तास ठेवणे...म्हणजे ते पीठ छान अंबते..आणि त्याचा इडल्या खूप छान होतात...खरे पाहिले तर इन्स्टंट इडली पेक्षा अशी उबवलेली इडली खाण्यास फायदेशीर आहे हे

  2. 2

    मग इडली चे बॅटर मध्ये मीठ घालून ते पीठ इडली पात्रात घालून इडली करून घ्या

  3. 3

    तयार इडली चे काप करून घ्या...एका भांड्यात दही, मेयोनीज सॉस व सारे मसाले घालून एकजीव करून घ्या. तुकडे केलेले इडलीचे काप
    व भाज्या त्या मसाल्यात अर्धा तास मॅरीनेट करून ठेवा

  4. 4

    त्यानंतर एका स्टिक ल पहिल्यांदा कांदा, सिमला मिरची, इडली चे काप परत कांदा, सिमला,मिरची इडली चे काप लावा. तव्यावर थोडे बटर टाकून ती स्टिक शॅलो फ्राय करून घ्या

  5. 5

    लाल चटणी साठी वरील सारे साहित्य मिक्सर मधून वाटून घ्या

  6. 6

    हिरव्या चटनिसाठी सारे साहित्य घालून मिक्स मधून वाटून घ्या...यात तुम्ही पुदिना सुद्धा घालू शकता..मला पुदिन मिळाला नसल्यामुळे मी घातला नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्वाती सारंग पाटील
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes