कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात अंडी उकडून घ्या. थंड झाल्यावर कवच काढून. मधोमध कापून दोन भाग करा. एका कढईत तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.
- 2
आता त्यात लसूण, आले भाजून घ्या. त्यामध्ये नारळाचा चव घालून खरपूस भाजून घ्या.
- 3
मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. कढई मध्ये तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा घालून परतावे.
- 4
कांदा तांबूस रंगाचा झाल्यावर त्यात मालवणी मसाला घाला. लगेच वाटलेले मिश्रण घाला. गरम मसाला आणि मीठ घालून एक उकळी काढा.
- 5
उकळी आल्यावर त्यात कापलेली अंडी सोडा. मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्या. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला. खमंग अंडा मसाला खाण्यासाठी तयार!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12328249



















टिप्पण्या