दाबेली

Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614

#स्ट्रीट दाबेली हा असा पदार्थ आहे जो तिखट, गोड, आंबट ह्या सगळ्या चवी एकसाथ देत, म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवतेय दाबेली.

दाबेली

#स्ट्रीट दाबेली हा असा पदार्थ आहे जो तिखट, गोड, आंबट ह्या सगळ्या चवी एकसाथ देत, म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवतेय दाबेली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 किलोउकडून कुस्करलेले बटाटे
  2. 2मोठे चमचे गुळ
  3. चवीनुसारमीठ
  4. 3 चमचेदाबेली मसाला
  5. सजावटीसाठी
  6. 1 टिस्पुनडाळिंबाचे दाणे
  7. १ टि स्पुनमसाला शेंगदाणे
  8. १ टेबल स्पुनशेव
  9. १ टि स्पुनबारीक चिरलेला कांदा
  10. १ टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. दाबेली मसाला बनवण्यासाटी
  12. 1/4 कपधने
  13. 1 इंचदालचिनी
  14. 1 चमचाजिरं
  15. 2 चमचेसफेद तीळ
  16. 1 चमचाबडीशेप
  17. 1/4 कपसुक खोबरं
  18. 2तमालपत्र
  19. 4लवंग
  20. 4काळी मिरी
  21. 1चक्रीफूल
  22. 2 इंचचिंच
  23. 2 चमचेआमचूर पावडर
  24. 1सुकी लाल मिरची
  25. 2 चमचेलाल तिखट
  26. 1 चमचासाखर
  27. 2 चमचेतेल
  28. 2 चमचेबटर

कुकिंग सूचना

  1. 1

    दाबेली मसाला बनवण्यासाटी सगळे गरम मसाले कढईत परतून बारीक वाटून घ्यायचं. त्यात 1 चमचा सुक खोबरं, आमचूर पावडर, साखर, मीठ, आणि लाल तिखट एकत्र करून घ्यायचं. हा मसाला हवाबंद ढाब्यात सहा महिने टिकतो.

  2. 2

    एका कढईत 2 चमचे तेल घेऊन ते गरम झाल्यावर गँस बंद करावा. गरम तेलात गुळ टाकून तो विरघळवून घ्यावा. त्यात दाबेली मसाला घालून एकत्र करून घ्यावं.

  3. 3

    मसाल्यात उकडलेला बटाटा घालून एकजीव करून त्यात चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्यावं.थंड झालेलं मिश्रण ताटात थापून त्यावर आवडीनुसार सुक खोबरं, शेव, डाळिंबाचे दाणे आणि मसाला शेंगदाणे टाकून, कोथिंबीर टाकून सजवावे.

  4. 4

    पाव घेऊन त्याला मधून कट करून घ्यावा. त्यात आवडीनुसार बनवलेल मिश्रण, कांदा, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे घालून तव्यावर बटर मध्ये खरपूस भाजून घ्यावेत. आपली दाबेली तयार झाली. (मसाला शेंगदाणे बनवण्यासाटी भाजलेल्या शेंगदाण्याच्या डाळी करून त्याला दाबेली मसाला आणि 1/2 चमचा तेल लावून घ्यावं.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes