भेंडी मसाला आणि कुलचा
कुकिंग सूचना
- 1
कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घ्या. भेंडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. एका कढईमध्ये 2 टेबल स्पून तेल तापवून घ्या. त्यात कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात टोमॅटो घालून परतवून घ्या. नंतर त्यात काजू, मगज, जीरे घालून चांगले भाजून घ्या.
- 2
मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून पेस्ट करून घ्या. आता कढईमध्ये एक टेबल स्पून तेल तापवून घ्या त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला. परतून घ्या. नंतर त्यात तयार केलेली पेस्ट घाला. आता त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, जीरे पूड आणि मीठ घालून चांगले एकजीव करा.
- 3
आता त्यात भेंडी घाला आणि ढवळा. झाकण ठेवून चांगली वाफ काढा. आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्या. अशाप्रकारे भेंडी मसाला तयार.
- 4
कुलचाचे पीठ तयार करण्यासाठी, एका बाऊल मध्ये मैदा घ्या. त्यात दही, बेकिंग सोडा, साखर आणि मीठ घाला. आता पाणी घालून सैलसर मळून घ्या. नंतर तेल घालून छान मळून घ्या. आता त्यावर कापड आच्छादून झाकून ठेवा. तीस मिनिटे बाजूला ठेवा.
- 5
आता पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या. लाटणीने जाडसर लाटून घ्या. लाटताना त्यावर कोथिंबीर पेरा. त्यावर पाण्याचा एक हात लावून ती बाजू तव्यावर चिकटवावी. तवा उलटा करून गॅस वर भाजून घ्या. भाजून झाले की त्यावर बटर लावा. अशाप्रकारे कुलचा बनवून घ्या.
- 6
गरमागरम भेंडी मसाला आणि कुलचा लिंबू आणि कांद्यासोबत सर्व्ह करा!
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या